सोयाबीन पिकाची अग्रीम रक्कम वाटप कृषी आयुक्त यांना सूचना

लोहारा : लोहारा तालुक्यातील तीनही महसूल मंडळात मंजूर असलेली यावर्षीची सोयाबीन पिकाची अग्रीम रक्कम वाटप करणे बाबत नीता शिंदे आवर सचिव कृषी महाराष्ट्र राज्य यांनी कृषी आयुक्त यांना सूचना दिल्याची माहीती राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल जगताप यांनी दिली आहे.
याबाबत माहिती अशी की अनिल जगताप यांनी 20 ऑक्टोबर रोजी नीता शिंदे माननीय आवर सचिव कृषी यांची मंत्रालयात भेट घेऊन लोहारा तालुक्यातील तीनही महसूल मंडळांना मंजूर असलेली सोयाबीनची पिकाची चालू खरीप हंगामातील मंजूर असलेली अग्रीम रक्कम देण्याबाबत विनंती केली. माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या 21 9 22 च्या जिल्हास्तरीय पिक विमा बैठकीत लोहारा तालुक्यातील तीन महसूल मंडळे, तुळजापूर तालुक्यातील सात महसूल मंडळे व उमरगा तालुक्यातील पाच महसूल मंडळे अशा एकूण 15 महसूल मंडळाला सोयाबीन पिकाची अग्रीम रक्कम मंजूर झालेली आहे.
एक जुलै 2022 च्या शासन निर्णयानुसार अपेक्षित उत्पादनात 50 टक्के घट येत असल्यास 25 टक्के अग्रीम रक्कम देण्याची तरतूद आहे त्यानुसार ही शिफारस करण्यात आली आहे लोहारा तालुक्यातील सरासरी उत्पादन घट ही 58.20% इतकी दाखवण्यात आली आहे त्यामुळे 35 हजार 297 हेक्टर वरील सोयाबीन पीक नुकसानी पोटी 33496 शेतकऱ्यांना जवळपास 27 कोटी 58 लाख इतकी मदत मिळणे अपेक्षित आहे. ही मदत नाही मिळाल्यास यापूर्वीच 27 ऑक्टोबर नंतर तहसीलदार ,कृषी अधिकारी यांना घेराव घालण्याचा आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मात्र अवर सचिव नीता शिंदे यांनी कृषी आयुक्त यांना फोन करून पंधरा दिवसात अग्रीम देणेबाबत कंपनीला सूचना करावी अशी सांगितले आहे त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन हे आंदोलन स्थगित करून 17 नोव्हेंबर रोजी करण्यात येईल त्यावेळेस कुणाची ही विनंती मान्य करण्यात येणार नाही.
नीता शिंदे आवर सचिव कृषी महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या पत्राची तातडीने दखल घेत कृषी आयुक्तांना फोन करून आगरीम रक्कम देण्याबाबत सूचना केल्याबद्दल जगताप यांनी त्यांचे आभार मानले.