सास्तुर ग्रामपंचायतीवर भाजपाची एकहाती सत्ता आल्याने जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील यांचा सत्कार

उस्मानाबाद : उस्मानाबाद भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सास्तुर ग्रामपंचायत निवडणुकीत दादांच्या पत्नी माजी जि.प.सदस्या शितलताई राहुल पाटील ह्या सरपंचपदासाठी भरघोस मतांनी निवडुन आल्याबद्दल लोहारा तालुका भाजपा महिला मोर्चा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत दादांच्या पत्नी माजी जि.प.सदस्या शितलताई राहुल पाटील ह्या सरपंचपदासाठी भरघोस मतांनी निवडुन आल्याबद्दल लोहारा तालुका भाजपा महिला मोर्चा यांच्या यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्षा तथा नगरसेविका आरती सतिश गिरी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, सतिश गिरी, डॉ.सुनिल मंडले, माधव शिरसाट, प्रविण कांबळे, शुभम गोसावी, अजय गोसावी, गौरव गोसावी, प्रणव गिरी, अदि उपस्थित होते.