आ. ज्ञानराज चौगुले यांचा शिक्षण संचालक डॉ. डी. आर. माने यांच्या हस्ते सत्कार

उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठाच्या अधिसभेवर आमदार ज्ञानराज चौगुले यांची महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणुन निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय शिक्षण धोरण कार्यालय पुणे चे संचालक डॉ.डि.आर माने यांच्या हस्ते उमरगा -लोहारा मित्रमंडळ च्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी रमेश पाटील, संचालक ए जी पाटील एज्युकेशन ट्रस्ट सोलापूर , वास्तु विशारद, पुणे नायब काझम, उद्योजक रवी गाडेकर, डॉ.गोविंद जाधव, विजय वडदरे, श्रद्धानंद माने पाटील , प्रा मगर, शाखा अभियंता किरण भोजने आदी जण उपस्थित होते.