लोहारा शहरातील पत्रकार नीलकंठ कांबळे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरव

लोहारा : लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथे रविवारी २० ऑगस्ट रोजी पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी याप्रसंगी संमेलनाचे उद्घाटन माजी ग्रामविकास राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते लोहारा शहरातील दैनिक सकाळचे पत्रकार नीलकंठ कांबळे यांना आष्टाकासार येथे समीक्षा फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. सुरेश वाघमारे , समीक्षा फाऊंडेशनचे मुख्य प्रवर्तक डॉ. दत्तात्रय गायकवाड, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप भालेराव ,सरपंच सुलभा काबळे यांच्या आदी उपस्थित होते.