सोलापुरचा राम शेळके ठरला बसव केसरीचा मानकरी

HTML img Tag Simply Easy Learning
जेवळी, ( ता. लोहारा ) : ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेनिमित्य आयोजित कुस्ती स्पर्धेत राम शेळके (सोलापूर) यांनी अंतिम कुस्ती एकवीस हजार व दोन किलो चांदीची गदा जिंकून बसव केसरीचा मान पटकाविला. या कुस्ती फडाचे उद्घाटन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कुस्ती पाहण्यासाठी परिसरातील कुस्ती शौकिनांची मोठी गर्दी केली होती.
तीन दिवसापासून सुरु असलेल्या या यात्रेचा समारोप सोमवारी (ता.२४) कुस्त्याच्या दंगलीने झाला. यावेळी कुस्ती फडाचे उद्घाटन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते पार पडले यावेळी युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख मोहन पणुरे, शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, महाराष्ट्र चॅम्पियन पै. धनराज भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिसरात ही यात्रा मोठ्या स्वरूपात भरवली जाते. कुस्ती ही या यात्रेचे मुख्य अकर्षन असते. माजी मुख्याध्यापक बी एम बिराजदार यांच्या वतीने ठेवण्यात आलेले पंचवीस हजार रुपये व चांदीच्या गदेसाठीची अंतिम कुस्ती राम शेळके (सोलापूर) विरुद्ध अनिल गोरे (बीड) अशी झाली. यात राम शेळके यांनी बाजी मारत बसव केसरीचा मान पटकाविला. तर राजेंद्र पांडुरंग जेवळीकर यांच्यावतीने ठेवण्यात आलेल्या एकवीस हजार रुपयांसाठीची द्वितीय कुस्ती ही जीवन भुजबळ (वाडी वडगाव) विरुद्ध विजय मोठे (बामणेवाडी) यांच्यांत लढत झाली. यात जीवन भुजबळ यांनी बाजी मारली. या बरोबरच यावेळी अनेक लहान मोठ्या कुस्त्या पार पडल्या. सांयकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत प्रकांश झोतात या कुस्त्या खेळवल्या गेल्या. यावेळी पंच म्हणून दादासाहेब थोरे, ब्रह्मानंद कार्ले, व्यंकट भुजबळ, अरुण हावळे आदींनी काम पाहिले तर या कुस्तीचे समालोचन गोविंद घारगे यांनी केले. रात्री नऊ वाजता यात्रा समितीच्या वतीने कोल्हापुर येथील ॲर्केस्ट्रा व नाटीका सादर करण्यात आली. या नाटीकेचे उद्घाटन मुख्याध्यापक कल्याणी ढोबळे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक (छ. संभाजीनगर) बाबा राठोड हे होते. यावेळी निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर पवार, खासदारांचे स्वीय सहाय्यक वैजनाथ पाटील, अभियंता सतेश्वर हावळे, अभियंता शिवराम हावळे, लक्ष्मण धोत्रे महेश सुरवसे, वैजनाथ हावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यात्रा यशस्वीतेसाठी यात्रा समितेचे अध्यक्ष बसवराज कारभारी, उपाध्यक्ष बाबुराव हावळे, सचिव मल्लीनाथ डिग्गे, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे महादेव मोघे, शिवशरण कारभारी, गुंडाप्पा कारभारी, सुभाष सारणे, बाळासाहेब कटारे, बालाजी निंगशेट्टी, महादेव सारणे आदीनी परिश्रम घेतले.


दरम्यान रविवारी (ता २३) रात्री नऊ वाजता छबिन्याची गावातील मुख्य रस्त्यावरुन मिरवणूक काढून बसवेश्वरांच्या मंदिरात मिरवणूकीचे विसर्जन करण्यात आले. यात ऐतिहासीक, सामाजिक धार्मिक देखावे (सोंग) सादर करण्यात आले होते. या नंतर बसवेश्वर विद्यालयाच्या मैदानावर आतषबाजीत शोभेचे दारु काम पार पडले. याचे उद्घाटन श्रीनिवास बुरावार व बसवराज सुर्यकांत कारभारी यांच्या हस्ते झाले. यावेळी दारु कामाची आतषबाजी पाहण्यासाठी परिसरातील नागरी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!