माजी सरपंच संजय नलावडे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

चिंचवड : ( प्रतिनिधी )
वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी वाल्हेकरवाडी येथील बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते आणि सोलापूर जिल्ह्यातील माजी सरपंच संजय नलावडे यांनी आपला वाढदिवस आनोख्या पद्धतीने वृद्धाश्रमात साजरा केला. संजय नलावडे यांनी आपला वाढदिवस गुरुद्वारा चौकातील संत मोनी बाबा वृद्ध आनंद आश्रमातील वास्तव्यास असणाऱ्या ७० ते ८० वृद्धांना फळांचे वाटप करून संजय नलावडे यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत एक आदर्श निर्माण केला आहे. वाढदिवस वृद्धआश्रमात साजरा करत संजय नलावडे यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.

राजकारणी,बांधकाम व्यावसायिक आणि दिखाऊपणा हे अतूट नाते सध्या आपल्याला सगळीकडेच दिसते. छोट्यातल्या छोट्या गोष्टीचे भांडवल करत आपली राजकीय आणि व्यावसायिक पोळी भाजून घेणे हा राजकारण्यांसह बांधकाम व्यावसायिकांचा आवडता छंद. आपला वाढदिवस जणू संपूर्ण शहराचा उत्सवाचा दिवस आहे अशा थाटात होर्डिंग्स, बॅनर्स लावून शहरभर अडचणी उभ्या करणे हाही त्यांच्या आवडीचा उद्योग. ही सगळी मुखवट्यांची स्पर्धा चालू असताना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील आवाटी गावचे माजी सरपंच आणि सध्या वाल्हेकर वाडी येथे बांधकाम व्यावसायिक असलेले संजय नलावडे यांनी स्वतःचा वाढदिवस वेगळ्याच पद्धतीने साजरा करायचे ठरवून एक नवीन आदर्शच घालून दिला आहे.

आपल्या वाढदिवसानिमित्त कुठेही कुठलेही बॅनर्स न लावता, कुठेही कसलेही होर्डिंग न लावता आपल्या परिसरातील वृद्धाश्रमात वास्तव्य करणाऱ्या ज्येष्ठांना फळांचे वाटप करून आपल्या वाढदिवसानिमित्त कुठलीही उधळपट्टी न करता पैसे सत्कारणी लावला आहे. राजकारण आणि व्यवसाय करत असताना, कायम स्वार्थी राजकारण करण्यापेक्षा समाजाच्या भल्यासाठी आपला वेळ आणि पैसा सत्कारणी लावणाऱ्या राजकारणी व्यक्ती अगदी विरळच दिसतात. संजय नलावडे यांचे उदाहरण मोलाचे ठरते.वाढदिवसाच्या अवाढव्य खर्चला बगल देत तो सामाजिक उपक्रमाने साजरा करून माजी सरपंच संजय नलावडे यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही गाजावाजा न करता त्यांनी गुरुद्वारा चौकातील संत बाबा मोनी साहेब वृद्ध आनंद आश्रमातील वृद्धांसमवेत वेळ घालवून,त्यांची आत्मीयतेने चौकशी करून आणि फळे वाटप करून त्याच बरोबर ममेली चौकातील श्री गुरुदत्त सेवा संस्थानातील श्री गुरुदत्त ज्येष्ठ नागरिक सेवा संघातील ज्येष्ठासंमवेत आपला वाढदिवस साजरा केला. दत्त मंदिरातील श्री दत्तांची आरती संजय नलावडे यांच्या हस्ते करण्यात आली त्यांनी वृद्धावर येणाऱ्या संकटाल दूर करण्यासाठी प्रार्थना केली आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याला अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपुलकी आणि प्रेरणेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या समाजकार्याला माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे,राजेंद्र साळुंके,युवा नेते शुभम वाल्हेकर, उद्योजक किरण घोडके, युवा नेते प्रशांत हादगे,मंगेश मातणे,विजय मोरे,रवी मोरे,संजय मारनुरे, सर्जेराव मारनुरे,दयानंद नायकवडी, प्रभू कांगणे, उमेश गायकवाड आदी सह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते,तरुण आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.



वृद्ध लोकांमध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद पाहून समाधान वाटले. रक्ताच्या नात्यांनी दूर ठेवले असले तरी त्यांच्या आठवणीत हे वृध्द आपले जीवन जगत असतात पण अशा वेगळ्या उपक्रमांनी त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होत असतो, शहरातील सुखवस्तू कुटुंबात राहणाऱ्याना वृद्धाश्रमातील वृद्धांचे प्रश्न समजून घेता यावे, सर्वांना आपले सामाजिक भान जपण्याबरोबरच त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण व्हावी यासाठी मी माझा वाढदिवस वृद्धाश्रमात आणि ज्येष्ठ नागरिकांसमवेत साजरा केला.

संजय नलावडे

माजी सरपंच,आवटी

बांधकाम व्यावसायिक,वाल्हेकरवाडी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!