उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची लाट येणाऱ्या निवडनुकीत दिसेल – युवासेना राज्य विस्तारक किरण लोहार

लोहारा : युवासेनेचे राज्यविस्तारक तथा धाराशिव जिल्ह्याचे युवासेनेचे संपर्कप्रमुख किरण लोहार यांच्या अध्यक्षतेखाली लोहारा तालुका युवासेनेची बैठक लोहारा शहरातील स्वरांजली मोटर्स येथे संपन्न झाली.
सदर बैठक युवासेना विभागीय सचिव तथा युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे,शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार,शेतकरी सेना तालुकाप्रमुख शेखर पाटिल,युवासेना उपजिलहाप्रमुख नामदेव लोभे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.या बैठकीदरम्यान पक्ष संघटन बांधणी,पक्षकार्य,पक्ष विस्तार या संदर्भात आढावा घेतला.युवासैनिकांच्या अडचणी जाणुन घेतल्या.युवासेनेसाठी इच्छुक असणारे पदाधिकारी यांच्या कामाचा आढावा घेतला.
किरण लोहार यांनी येणार्या काळात महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची लाट येईल असे सांगितले.येणाऱ्या लोकसभा,विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला (उध्दव बाळासाहेब ठाकरे) विजयी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन,अधिक जिद्दीने काम करणे गरजेचे आहे,शिवसेनेचा विजयी झेंडा पुन्हा एकदा फडकवण्यासाठी प्रत्येकाने जोमाने तयारीला लागावे असे आवाहन या बैठकी मध्ये करण्यात आले.
त्यांच्यासह युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, युवासेना जिल्हा संजय भोरे, शेतकरी सेना तालुकाप्रमुख शेखर पाटिल यांनी मार्गर्शन केले.तसेच नितिन जाधव,कुलदिप बडुरे,योगेश गोरे,अनिल मोरे,अंकुश परिट,चेतन गोरे,वसिम कादरी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.तसेच शिवदुत महेबुब गंवडी यांनी सुत्रसंचलन केले व आभार रेबे चिंचोलीचे उपसरपंच पवन मोरे यांनी मांडले.
यासह बैठकीस शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख,दिनेश बंडगर,माजी नगरसेवक शाम नारायणकर, युवासेना तालुकाप्रमुख धाराशिव वैभव विर,युवासेना शहप्रमुख दिनेश गरड,माजी वि.का.से.सो.सदस्य रघुविर घोडके,उपसरपंच गुरुनाथ यादव,विरपक्ष स्वामी,शिवदुत तुकाराम चौधरी,सोशल मिडीया प्रमुख प्रेम लांडगे,शाखा प्रमुख बालाजी जाधव,बालाजी मडुळे,गोपाळ गोरे,बळीराम गोरे,बंकट माळी,महादेव आनंदगावकर,महेश चपळे,जितु मुळे,गोपाळ ढोणे,गोविंद साठे,आकाश जावळे,अतुल चंदनशिवे, शुभम जावळे,नवनाथ भारती,योगेश गोरे,बळी कांबळे, सिध्देश्वर गिराम,विशाल बडुरे,विपुल बडुरे,सुरज सय्यद, जयदिप लोभे,सुरज मादुले,महेश नारगाळे, अनिकेत जाधव,सुरज शिवकर,खंडु गोसाई, आनंद जाधव, अशोक बडुरे,नेताजी महाबोले, संभाजी मोरे,नरसिंग जाधव,रवि भोंडवे, दिलिप काकडे, बाळासाहेब लोमटे, अक्षय जाधव,वैभव जाधव,तुषार रोडगे,भाग्यविर जाधव, गौस मुल्ला,गणपत पाटिल,राम पळसे,यासह युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.