लोहारा शहरातील आरक्षित जागेतच क्रीडा संकुल उभारा ; स्वराज्य संघटनेची मागणी

लोहारा / प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील प्रस्तावित असलेले क्रीडा संकुल हे लोहारा तालुक्यातच व्हावे यासाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनामध्ये म्हटले आहे की लोहारा नगरपंचायत यांनी आरक्षित केलेल्या जमिनीमध्ये क्रीडा संकुल करण्यात यावे किंवा नव्याने जागा आरक्षित करून क्रीडा संकुल साठी जमीन उपलब्ध करून देण्यात यावी लोहारा तालुक्यात अनेक शाळा महाविद्यालय तसेच शासकीय निम शासकीय कार्यालय व इतर सोयी सुविधा व रस्ते असल्यामुळे लोहरा येथेच क्रीडा संकुल करणे सोयीस्कर होणार असून याबाबत निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा अन्यथा स्वराज्य संघटनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन दिनांक 20/ 10/ 2023 पासून करण्यात येईल असे निवेदना म्हणून म्हटले आहे निवेदनावर जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश गोरे तालुकाध्यक्ष प्रशांत थोरात , नितीन मुळे, कार्याध्यक्ष युवराज साळुंखे ,बळी गोरे, ग्रामस्थ बसवराज पाटील, दिगंबर कांबळे, विजय भोंडवे ,विठ्ठल गोरे, रमेश माळवदकर, लक्ष्मण रोडगे, विजय मुरटे रशीद फकीर , बालाजी सोनटक्के, ब्रह्मानंद ढोबळे, ओम प्रकाश गोरे, लक्ष्मण गोरे, महेश देशमुख संतोष गोरे बालाजी मुळे ,सोमनाथ मुळे, मेघराज गोरे,आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!