शिवसेनेच्या पदाधिकारी, विभागप्रमुख व गणप्रमुख यांची बैठक संपन्न

लोहारा : शिवसेना पक्ष निरीक्षक श्री.नितीन लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार ज्ञानराज चौगुले, युवानेते किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सोमवारी दिनांक 07/08/2023 रोजी शासकीय विश्रामगृह उमरगा येथे आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद, लोकसभा या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक पार पडली.
या बैठकीत पक्ष निरीक्षक श्री.नितीन लांडगे हे बोलत होते, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विभागप्रमुख, गणप्रमुख, शाखाप्रमुख व शिवदुत यांनी शासन राबवित असलेल्या विकासाच्या व लोकांच्या हिताच्या योजनांची(वैयक्तिक लाभ, अत्यंत महत्वाचे असलेले आरोग्य विषयक) माहिती घरा-घरापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे व पक्ष वाढीसाठी 1 बुथ 10 युथ च्या माध्यमातुन प्रयत्न करावेत व आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांनी करत असलेल्या पक्ष वाढीसाठीच्या कार्याचा चढता आलेख बघुन दोघांचे अभिनंदनही यावेळी केले.
यावेळी उपतालुकाप्रमुख पदी श्री.राजेंद्र शिंदे पाटील, मुरुम शहरप्रमुख पदी सुरेश मंगरुळे व उमरगा शहरप्रमुख पदी श्री.योगेश तपसाळे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच लोहारा खुर्द ता.लोहारा चे सरपंच श्री.सचिन रसाळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या बैठकीस जिल्हा सहसंपर्क प्रमुख अमरराजे परमेश्वर, जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, कृऊबा समितीचे माजी सभापती सुल्तान शेठ, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, लोहारा तालुकाप्रमुख जगन पाटील, डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे आनंद मगर, शेतकरी सेनेचे विलास भगत, उपतालुकाप्रमुख व्यंकट पाटील, शेखर पाटील, दिपक जोमदे, लोहारा उपतालुकाप्रमुख परवेज तांबोळी, अनंत बायस, संदीपान बनकर, परमेश्र्वर साळुंखे, माजी गटनेते अभिमान खराडे, लोहारा नगरसेवक अविनाश माळी, अमीन सुंबेकर, गौस मोमीन व प्रमोद बंगले, ओम कोरे, दिपक रोडगे, आयुब शेख व उमरगा माजी नगरसेवक संतोष सगर, पंढरीनाथ कोणे, सचिन जाधव शरद पवार अमृत वर्णळे भगत माळी संदीप चौगुले अमर शिंदे हनुमंत गुरव, हनुमंत कोकाटे, माधव जाधव, सुरेश देशमुख, वैभव पवार, श्रीशैल ओवांडे, विनोद मुसांडे, अरुण जगताप, नाना मदनसुरे, अमोल सोमवंशी आदी पदाधिकारी विभागप्रमुख व गणप्रमुख मोठया संख्येने उपस्थित होते.