लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून केले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

लोहारा : कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून स्वागत केले.
यावेळी नगरसेवक प्रशांत काळे, मिटु ढगे, किशोर पाटील, विठ्ठल पाटील, हरी लोखंडे,इस्माईल मुल्ला, रौफ बागवान, अयनोदीन सवार, रफीक शेख,राम मिटकरी,नागनाथ तोडकरी, प्रकाश होंडराव, संतोष फावडे, ओम पाटील, प्रकाश लोखंडे, आप्पु स्वामी, अब्बास शेख आदी उपस्थित होते.