शैक्षणिक
इंग्लिश स्कूलमध्ये “वाचन प्रेरणा दिन” साजरा…

लोहारा / उमरगा : दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी भारताचे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सर्वप्रथम डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री शहाजी जाधव, प्रा. यशवंत चंदनशिवे, सोनाली काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपल्या प्रास्ताविकात प्रा.यशवंत चंदनशिवे म्हणाले की,आपल्या देशाचे दिवंगत राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतात. त्यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम् या छोट्याश्या गावी अतिशय गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या लहानपणी ते दररोज सकाळी वृत्तपत्र विकून त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशातून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून भारताच्या नामांकित इस्रो या अंतराळ संशोधन संस्थेत शात्रज्ञ म्हणून रुजू झाले.
त्यांनी इस्रोचे प्रमुख विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतीय बनावटीचे अंतराळ क्षेपणास्त्र विकसित करून जगामध्ये आपली ओळख मिसाईल मॅन अशी निर्माण केली, त्याचबरोबर त्यांनी भारताचे राष्ट्रपती हे पद भूषविले. अशाप्रकारे त्यांनी आधुनिक भारताच्या विकासासाठी खूप मोठे योगदान दिले त्यामूळे त्यांना भारत सरकारतर्फे “भारतरत्न” हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी आपल्या विचारातून देशातील तरुणांना असा संदेश दिला कि, स्वप्न मोठे पहात रहा आणि त्यासाठी रात्रंदिवस मेहनत घ्या, तरच ते स्वप्न साकार होतात तेहि फक्त शिक्षणाच्या मदतीनेच. अशा या महान शात्रज्ञाचा जन्मदिवस संपूर्ण भारत देशात “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो.