लोहारा शहरात जिल्ह्यातील पहिले प्रशासकीय सेवा महाविद्यालय

लोहारा : आज स्पर्धा परीक्षेकडे करिअर म्हणून पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे यापूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करणान्यामध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग होता परंतु आज चित्र बदललेले आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी ही या परीक्षेकडे वळला आहे परंतु तज्ञ प्राध्यापक, योग्य मार्गदर्शन, साधनांचा अभाव, पोषक वातावरण अशा अनेक समस्या त्याच्या समोर उभ्या आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी ग्रामीण विकास संस्था नागराळ (लोहारा ) ने कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या अंतर्गत लोहाऱ्यामध्ये बी. ए. नागरी सेवा व एम. ए. लोकप्रशासन या सारखा पदवी व पदव्युत्तराचा अभ्यासक्रम घेऊन जिजाऊ मेमोरियल प्रशासकीय सेवा महाविद्यालयाची स्थापना महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा आदेश क्रमाकः
मान्यता- 2022/ (81/22)/मशि-4 यानुसार 15 जुलै, 2022 मध्ये करण्यात आली. शहरी भागातील विद्यार्थी ग्रामीण विद्याथ्र्यापेक्षा खूपच पुढे असतात त्यांचे लक्ष ठरलेले असते ते पदवीपूर्वीच याविषयी जागृत असतात व त्या दृष्टीने ते मार्गक्रमण करीत असतात ग्रामीण भागातील विद्यार्थी पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करतो तेव्हा त्याची अवस्था मार्गदर्शना अभावी गोंधळलेले असते त्याची स्पर्धा परीक्षेविषयीची माहिती खूपच तोकडी असते जेव्हा माहिती होते तेव्हा त्याची एक दोन वर्षे वाया गेलेले असतात अशा
समस्येचे आकलन करून जिजाऊ मेमोरियल प्रशासकीय सेवा महाविद्यालयातील महाविद्यालयामध्ये जो अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे तो संपूर्ण नागरी सेवा परीक्षेच्या धर्तीवर आधारित आहे. उदाहरणार्थ जर या महाविद्यालयात एखादा विद्यार्थ्याने प्रवेश घेतला तर त्याचा अभ्यासक्रम हा पुढील प्रमाणे ठरलेला आहे- अनिवार्य विषयांमध्ये संस्कृत, इंग्रजी, सामान्य अध्ययन भाग-1 सामान्य अध्ययन भाग-2, त्यानंतर ऐच्छिक विषयांमध्ये इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, भूगोल, मराठी साहित्य, संस्कृत साहित्य, पाली साहित्य, इत्यादी विषयाचा समावेश केलेला आहे. सिविल सर्विसेसचा अभ्यासक्रम लोहाऱ्यासारख्या शहरांमध्ये सुरू झाल्यामुळे शहरातील व परिसरातील जे विद्यार्थी (सिविल सर्विसेस) नागरी सेवेची तयारी करण्यासाठी पुणे, लातूर, औरंगाबाद अशा मोठमोठ्या शहरांमध्ये जातात त्यासाठी लाखो रुपये खर्च होतात ते वाचवण्याचे कार्य या महाविद्यालयामुळे शक्य होणार आहे. असे जिजाऊ मेमोरियल प्रशासकीय सेवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मराज शिवाजी पवार यांनी सांगितले आहे.