समीक्षा फाऊंडेशनचे “जीवन गौरव” पुरस्कार जाहीर

लोहारा : समीक्षा फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा “जीवन गौरव” पुरस्कार जाहीर झाले असून ज्येष्ठ लेखिका सुरेखा शहा (सोलापूर), ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक, कवी योगिराज वाघमारे (सोलापूर), लोहारा शहरातील सकाळचे पत्रकार नीलकंठ कांबळे हे यंदाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. समीक्षा फाऊंडेशनचे मुख्यप्रवर्तक डी. टी. गायकवाड, सचिव समीक्षा गायकवाड यांनी पुरस्कार निवडीची घोषणा केली आहे.
लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील समीक्षा फाऊंडेशन गेली बारा वर्षांपासून विविध क्षेत्रात कार्यरत आहे. फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक, साहित्य, पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी “जीवन गौरव” पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. पुरस्काराचे हे आठवे वर्ष आहे. यापूर्वी अनेक नामवंतांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी सोलापूर येथील ज्येष्ठ लेखिका सुरेखा शहा, ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक कवी योगिराज वाघमारे, पत्रकार नीलकंठ कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचे वितरण २० ऑगस्ट रोजी आष्टाकासार येथे आयोजित पहिले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलनात मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येणार असल्याची माहिती समीक्षा फाऊंडेशनचे मुख्यप्रवर्तक डाॅ.डी.टी. गायकवाड यांनी दिली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!