“बकरी ईद”ची सार्वजनिक सुट्टी बुधवार, दि.28 जून ऐवजी गुरुवार, दि.29 जून रोजी जाहीर

अलिबाग,दि.26(जिमाका):- शासनाकडून सन २०२३ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील “बकरी ईद” ची सार्वजनिक सुट्टी बुधवार, दि.२८ जून २०२३ रोजी दर्शविण्यात आली होती. मात्र हा सण गुरुवार, दि.२९ जून २०२३ रोजी येत असल्याने दि.२८ जून २०२३ रोजीची सुट्टी रद्द करुन गुरुवार, दि.२९ जून २०२३ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाचे सह सचिव सो.ना.बागुल यांनी जाहीर केली आहे.
तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
000000

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!