बाळाच्या आरोग्यासाठी मातांनी सकस आहार घ्यावा – डॉ. रोहन हुडगे

विश्वेश्वर संकुलातील हळदी कुंकू कार्यक्रमात मातांना आव्हान

औसा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत शिवलिंगेश्वर कॉल्ेज ऑफ फार्मसी, विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय, दगडोजीराव देशमुख डी. फार्मसी कॉलेज, ब्ल्यु बर्ड इंटरनॅशनल स्कुल, ब्ल्यु बर्ड सायन्स कॉलेज, आयोजित विश्वेश्वरय्या पॉलिटेक्निक सभागृहात दिनांक 28 जानेवारी 2023 वार शनिवार रोजी विद्यार्थ्याच्या माता पालकासाठी हळदी कुंकू कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन लातूरचे प्रसिध्द बालरोगतज्ञ डॉ. रोहन हुडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन औसा शिवसेनेचे तालुका प्रमुख गणेश माडजे, अध्यक्ष म्हणुन संसथेचे सचिव बसवराज धाराशिवे, विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे, शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे, राहुल धानुरे, ब्ल्यु बर्ड इंटरनॅशनल स्कुलच्या प्राचार्या स्वाती कापसे, ब्ल्यु बर्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य योगेश माशाळकर, डॉ. समीर शफी, विभागप्रमुख रेवणसिध्द बुक्का, प्रशांत ध्ुमाळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रशांत धाराशिवे यांनी करताना संस्थेच्या अंतर्गत घेण्यात येणाया शैक्षणिक, सामाजिक उपक्रमाची माहिती देऊन संस्था ही स्थापनेपासूनच सामाजिक बांधीलकी जोपासत विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीकरिता विविध उपक्रमाच्या व्दारे आदर्श विद्यार्थी कसा घडला जाईल याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करते. आज या हळदी कुंकु कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या माता पालकांना एकत्रित करून त्यांच्या व त्यांच्या पाल्याच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन त्यावर तज्ञ मार्गदर्शकाचे मार्गदर्शन करत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात जवळपास 576 माता पालकांनी आपला सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनपर मार्गदर्शनात लातूरचे प्रसिध्द बालरोगतज्ञ डॉ. रोहन हुडगे यांनी महिलांच्या व बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने सखोल असे मार्गदर्शन करून बाळासाळी मातांना संबोधताना मातेचे दुध हे सुरूवातीच्या काळात बाळासाठी अमृत असते तसेच आज समाजात माता पालकामध्ये अनेक समज गैरसमज असून ते त्यांनी कुठल्याही प्रकारे न लपवता यामध्ये गर्भधारणेमध्ये येणाया समस्या, माता झाल्यानंतर येणाया समस्या या तज्ञ डॉक्टरांना दाखवून घाबरून न जाता त्यावर उपाय करून घ्यावा. तसेच महिलांनी फास्ट फुड खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे यापासून स्वत: व बाळास दुर ठेवावे व बाळासाठी जुन्या चालीरिती, परंपरा सोडून नवीन पध्दतीमध्ये म्हणजेच पुर्वी बाळ जन्मल्यानंतर मध चाखायला द्यायचे ते न देता बाळाला आईचे दुध, गुट्टी देऊन बाळामध्ये लोहाचे प्रमाण कमी होणार नाही याची काळजी घ्यावी असे सांगीतले. आज ब्ल्यु बर्ड इंटरनॅशनल स्कुलच्या जवळपास 80 विद्यार्थ्याच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विद्या येलम (कापसे), अंजली येरटे, प्रियंका पल्लोड, रेशमा पाडुळे, ज्योती बोकडे, निशाद सय्यद, मेघा माळी, शुभांगी गंगथडे, रेणुका शिंदे, दिक्षा आगरे, अनुजा सुर्यवंशी, सुरवसे श्रध्दा, प्रगती कांबळे, प्रियंका बंडगर, स्नेहा कचरे, भाग्यश्री हिंडोळे, रूपाली उटगे, यास्मीन फाजल, सुवर्णा वागदरे, दिपा पोतदार, रश्मी दुधनकर व विद्यार्थ्याने परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शिवकांता धाराशिवे, दिपमाला धाराशिवे, अलकनंदा धाराशिवे, मेघा धाराशिवे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. मयुरी चंद्रवंशी तर आभार प्रदर्शन प्रा. कविता सिरगिरे रोडगे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!