लोहारा हायस्कूलमध्ये उद्या शुक्रवारी “ओळख देशभक्तांची व शाळा तेथे क्रांती मंदिर’ “अभियानाचे आयोजन 

लोहारा : लोहारा येथील लोहारा हायस्कूलमध्ये दिनांक 07 जुलै 2023 वार शुक्रवार रोजी सकाळी 09 ते दुपारी 01 वाजेपर्यंत 2000 क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनात
देशभक्तकोशकार श्री चंद्रकांत शहासने यांच्या संग्रहात असलेल्या सुमारे २००० क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे सचित्र प्रदर्शन, १५,००० हुतात्म्यांची महिनावार नोंद, १०,००० क्रांतिकारकांची माहिती देणारा असा देशभक्तकोश या साहित्याचे दर्शन लोहारा शहरातील व तालुक्यात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना पहावयास मिळनार असून आपल्या स्वातंत्र्याचा धगधगता इतिहास आणि त्याचा दुर्मीळ असा डिजीटल डेटा मान्यवरांच्या हस्ते कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत लोहारा हायस्कूल व न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलकडे सुपूर्त करण्यात येनार आहे. हा डिजीटल डेटा या संस्थांनी आपल्या तालुक्यातील तसेच आपल्या अधिपत्याखालील आणि ओळखीतील सर्व शाळांकडे सुपूर्त करावा. ज्यायोगे महाराष्ट्रातील बहुतांश शाळांमध्ये ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांतीमंदिर हा विषय पोहचविणे शक्य होईल. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन लोहारा तालुक्यातील उस्मानाबाद जिल्हा एज्युकेशन सोसायटी गुंजोटी संचलित न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा हायस्कूल याठिकाणी होणार आहे. अशा या दुर्मिळ प्रदर्शनीस लोहारा शहरासह तालुक्यातील सर्व शाळांनी भेट देवून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आपली संस्कृती व स्वातंत्र्याचा इतिहास या प्रदर्शनातून पाहून स्वतः याचा अनुभव घेवुन विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळावी यासाठी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेत लोहारा हायस्कूल याठिकाणी घेवून यावे व यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन करून कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे हि धर्मादाय संस्था गेली 23 वर्ष क्रांतिकारकांनी चेतविलेल्या बलिदानाच्या ज्योतीचा धगधगता इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा राष्ट्रीय कार्य करत आहेत,अशी माहितीही संयोजक श्री चंद्रकांत शहासणे यांनी दिली. हे प्रदर्शन पाहण्यासाठी लोहारा येथील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च – माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याना पाहण्यासाठी पाठवण्याची परवानगी संबधित शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी द्यावी व हे अद्भुत व दुर्मिळ प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे अशी विनंती लोहारा हायस्कूल लोहाराचे मुख्याध्यापक श्री डी.एम. पोतदार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!