लोहारा (खुर्द) येथील सरपंचावरील अविश्वास ठराव रद्दबातल

लोहारा : लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील सरपंच सचिन रसाळ यांच्या विरोधात मंजूर झालेला अविश्वास ठराव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी रद्दबातल ठरवला आहे. त्यामुळे सरपंच रसाळ यांना दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील लोहारा (खुर्द) ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सरपंच सचिन व्यंकटराव रसाळ यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. तत्कालीन तहसीलदार संतोष रूईकर यांच्या उपस्थितीत ५ एप्रिल रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या विशेष बैठकीत सहा विरूध्द एक अशा बहुमताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. सरपंच रसाळ यांनी अविश्वास ठरावाविरेधात अॅड. विशाल साखरे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले होते. याप्रकरणी आज मंगळवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सन २०१८ अंतर्गत नवीन नियमावली अनुसार कोणताही अविश्वासाचा ठराव हा ३/४ बहुमताने पारित करणे आवश्यक होते. परंतु तसे झालेले नाही. शिवाय अविश्वास ठरावाबाबत आलेल्या अर्जाच्या तारखेनंतर एक दिवस सोडून सात दिवसांच्या आत अविश्वास ठराव घेण्यासाठी सभेचे आयोजन करणे तहसीलदार यांना बंधनकारक व आवश्यक आहे. परंतु तहसीलदार यांनी अविश्वास ठराव कायद्याच्या तरतुदीच्या व मुंबई ग्रामपंचायत अधिनियममधील विविध तरतुदीच्या विरुद्ध घेण्यात आल्याचा अॅड. विशाल साखरे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सरपंच रसाळ यांच्या विरोधात घेण्यात आलेला अविश्वासाचा ठराव रद्दबातल ठरवला आहे. सदर प्रकरणात अॅड. विशाल साखरे यांना अॅड लक्ष्मीकांत कुलकर्णी, अॅड विजया गुंड ॲड. प्रविण लोमटे, अॅड., अर्चना कांबळे यांनी सहकार्य केले.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!