हिंदु – मुस्लिम एकतेचे दर्शन ; आषाढी एकादशी निमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने फराळ व मसाला दुध वाटप

लोहारा/प्रतिनिधी
आषाढी एकादशी निमित्त गुरुवारी
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.29 जुन 2023 रोजी मुस्लीम समाज व कुरेशी समाज व ए.जी.युवा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक भावना जपत हिंदु बांधवांसाठी फराळ, मसाला दुध वाटप करण्यात आले. मुस्लिम समाजाच्या वतीने सामाजिक भावना जपत फराळाची व्यवस्था करुन हिंदु , मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले.
यावेळी ए.जी.युवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, नगरसेवक अमिन सुंबेकर,माजी नगरसेवक अभिमान खराडे, बाळासाहेब पाटील,अमिन कुरेशी, सलीम कुरेशी, जाकेर कुरेशी, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, शब्बीर गवंडी, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, शालेय व्यवस्थापन समिती सभापती के.डी. पाटील, मल्लिकार्जुन पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला, युवा कॉंग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, बापु जट्टे, सुनिल वाले, गौस कुरेशी, बाबा कुरेशी, कलीम कुरेशी, आफताब कुरेशी, हाजी कुरेशी, इस्माईल कुरेशी, खंडु शिंदे, अशपाक शेख, ताहेर पठाण, जहिर खुटेपड, निहाल मुजावर, हामजा खुट्टेपड, समिर हेड्डे, साहिल खुट्टेपड, समिर मनियार आदि उपस्थित होते.