चोरीच्या 50 कट्टे सोयाबीनसह 2 आरोपी ताब्यात

धाराशिव : स्थानिक गुन्हे शाखा :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालाविषयक गुन्हे उघडकीस आणनेकामी दि. 27.06.2023 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे 1) जितेंद्र सुब्राव पवार, रा. गावसुद, ता. उस्मानाबाद, 2) करण भारत नेपते, रा. उमर मोहल्ला, उस्मानाबाद यांनी व त्यांचे इतर साथीदारांनी मौजे बारुळ, ता. तुळजापूर व मौजे पळसवाडी, ता. उस्मानाबाद येथुन सोयाबीन चोरी केली आहे. या बाबत पथकास बातमी मिळाले वरुन पथकाने तुळजापूर नाका, तसेच उमर मोहल्ला उस्मानाबाद येथुन दि. 27.06.2023 रोजी वरील दोन्ही आरोपीताना ताब्यात घेवून त्यांचे कडे सखोल तपास केला असता त्यांनी वरील ठिकाणचे सोयाबीन चोरी केल्याची कबुली दिली. त्या बाबत पोलीस ठाणे तुळजापूर गुरन- 419/2022 कलम 461, 380 भा.दं.सं. व पोलीस ठाणे उस्मानाबाद ग्रामीण गुरन- 260/2022 कलम 457, 380 भा.दं.सं. प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोयाबीन पैकी 50 कट्टे सोयाबीन (25 क्विंटल) असा एकुण 1,25,000 ₹ माल जप्त केला. सदर दोन्ही आरोपीस चोरीच्या मालासह पुढील कारवाईस्तव उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. त्यांचे इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखली पोलीस निरीक्षक श्री. यशवंत जाधव यांच्या आदेशावरुन सपोनि श्री. मनोज निलंगेकर, पोउपनि श्री. संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, अशोक ढगारे, रविंद्र आरसेवाड, बलदेव ठाकुर यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!