खरीप पिक विमा 2022 विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद बैठक संपन्न 

औरंगाबाद : 

🟣 चुकीचे भारांकण लावून वाटप केलेला पिक विमा आणखी 50 टक्के वाढवून देण्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे आदेश तसेच पंचनाम्याच्या व इतर कागदपत्राच्या प्रती एक महिन्याच्या आत द्या अन्यथा पोलीस कारवाई करणार

🟣 एक महिन्यात पंचनामाच्या प्रति उपलब्ध नाही केल्या तर खोट्या प्रती तयार केल्या समजून कारवाई करणार पोलीस कारवाई करणार.

🟣 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्वी दिलेल्या विमा एवढीच आणखी रक्कम मिळणार ही रक्कम जवळपास 259 कोटी इतकी आहे.

🟣 चुकीच्या पद्धतीने बाद करण्यात आलेल्या एक लाख 44 हजार पूर्व सूचनाचा पुन्हा आढावा दोन आठवड्यात घेण्याचे आदेश. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विमा द्यावा.

🟣  आमदार कैलास पाटील व राष्ट्रवादी कॉग्रेसचे अनिल जगताप दोघांनी दाखल केला होता तक्रारी अर्ज त्या अनुषंगाने आजची झाली बैठक.

🟣 युनियन बँकेचे खातेदार असलेल्या सर्व शेतकऱ्यांना दोन आठवड्यात पीक विमा देण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश.

🟣 बैठकीत लगेच आदेश पारित करून विमा कंपनीला सक्त सूचना दिल्या प्रोसिडिंगच्या प्रती दोनच दिवसात उपलब्ध करून देणार.

🟣 सदरील बैठकीसाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, आमदार कैलास दादा पाटील, पिक विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थापक व्ही सी द्वारे शकुंतला शेट्टी, व्ही सी द्वारे जिल्हाधिकारी उस्मानाबाद, राष्ट्रवादी कॉग्रेसचे अनिल जगताप, श्री आर एस पाटील विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी लातूर श्री सलगरे प्रभारी तंत्र अधिकारी लातूर जिल्हा कृषी अधीक्षक प्रतिनिधी काशीद साहेब व शेतकरी प्रतिनिधी सुधीर सुपणार कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!