सास्तूर निवासी दिव्यांग शाळेची उज्ज्वल १००% निकालाची परंपरा कायम

दिव्यांगांच्या सक्षमीकरणाचा सास्तूर निवासी दिव्यांग शाळेचा सुंदर उपक्रम
लोहारा : समाजातील अत्यंत शेवटच्या स्तरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेच्या माध्यमातून सक्षमपणे उभे करण्याचे कार्य मागील २८ वर्षापासून लोहारा तालुक्यातील सास्तूर या गावात निवासी दिव्यांग शाळेच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे.नुकताच शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला.सास्तूर निवासी दिव्यांग शाळेतील १५ विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते.सर्वच्या सर्व १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून,शाळेचे १००% निकालाचे हे १० वे वर्ष आहे.१५ पैकी १३ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले असून,२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
कु.साक्षी लक्ष्मण नाईक हिने ९५.२०% गुण मिळवत शाळेतून प्रथम आली असून, अभिषेक शिवाजी धानुरे हा ८९% गुण मिळवत द्वितीय आला आहे,तर कु. ऋतुजा बालाजी साळुंके ही विद्यार्थीनी ८७.८०% गुण मिळवत तृतीय आली आहे.विश्वजीत बालाजी बिराजदार याने ८७% गुण मिळवले असून,तो चतुर्थ स्थानी आहे. तसेच सिध्देश्वर दिपक मनाळे ८५.८०%, विनायक श्रीमंत सुतार८५.२०%, कु.रूपाली तुकाराम घोसले८४.४०%, ओमकार एकनाथ जावळे८३.६०%, अविष्कार ज्ञानेश्वर राठोडे ८३.४०%, ओमकार विठ्ठल मोरे ८३.२०%, वैभव सुनिल वायगावकर ७८.२०%, राज गायकवाड ७७.८०%, सोहेल इनामदार ७७.६०%, नागेश अंबादास सुर्यवंशी ७१%,रोहीत सचिन वाघमारे ६४.४०% गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बी.आर.बदामे, संस्थेच्या सचिव निर्मलाताई बदामे, मुख्याध्यापक बी.टी.नादरगे, प्राचार्य बी.एम.बालवाड यांनी अभिनंदन केले आहे.
शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक बी.टी.नादरगे,विशेष शिक्षिका अंजली चलवाड, संध्या गुंजारे, यास्मिन शेख, लक्ष्मी घोडक,प्रविण वाघमोडे, सुजीत स्वामी,बाबूराव ढेले,आर.ई.ईरलापल्ले, आर.डी. बेंबडे,आर.पी.गुंडूरे आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.