लोहारा शहरातील मुख्याध्यापक पोतदार व मंडळ अधिकारी मणियार यांचा सत्कार

लोहारा : लोहारा हायस्कुल लोहारा या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून डी. एम. पोतदार यांची नियुक्ती झाल्याबद्दल, व वर्ग मित्र तथा तलाठी वाजीद मणियार यांची मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती होऊन धानुरी (ता. लोहारा) मंडळात नियुक्ती झाल्याबद्दल शनिवारी (दि.२७) शाळेच्या माजी विद्यार्थी व मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक डी. एम. पोतदार यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सहशिक्षक विठ्ठल वचने-पाटील, सदाशिव बचाटे, दिलीप शिंदे, लोहारा हायस्कुल लोहारा शाळेतील सन २००३-०४ चे माजी विद्यार्थी धनश्री झिंगाडे, योगिता कुलकर्णी, सुनीता खबोले, सतीश ढगे, किरण पाटील, अमित बोराळे,
धानुरीचे मंडळ अधिकारी वाजीद मणियार, रामेश्वर वैरागकर, कमलाकर मुळे, प्रभाकर बिराजदार, दयानंद स्वामी, शरद पाटील, प्रशांत जट्टे, जितेश फुलकुर्ते, संतोष वाघमारे, महेश फरीदाबादकर, आप्पू स्वामी, अमोल रोडगे, तलाठी श्री. फड, सहशिक्षक दिलीप शिंदे, अमोल जाधव, महमंद हिप्परगे, अशोक दुबे, मुन्ना फकीर, यांच्यासह आदी उपस्थित होते.