स्वामी यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या जागेवरच सोडवल्या

उमरगा/लोहारा ( जि.धाराशिव ) : दिव्यांग बांधवाच्या कार्यालयीन विविध समस्या, अडिअडचणी सोडवण्यासाठी *दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष ( कॅबिनेटमंत्री दर्जा ) आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चु ( भाऊ ) कडू यांचे स्वीय सहायक सातलिंग स्वामी* यांच्या उपस्थितीत दिनांक 4 जुलै 2024 रोजी उमरगा येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी 01:00 ते संध्याकाळी 07:00 वाजेपर्यंत मेळावा घेण्यात आला.
सदर मेळाव्यामध्ये दिव्यांग बांधवांनी त्यांच्या वाट्याचा 5% शासकिय निधी ग्रामपंचायत खर्च करत नसल्याचे, गत चार ते पाच महिन्यापासून दिव्यांग बांधवांच्या पगारी मिळाल्या नसल्याने आर्थिक परवड होत असल्याबाबत व्यथा मांडण्यात आल्या. तसेच घरकुल मिळत नसल्याच्या तक्रारी, रेशनकार्डाची मागणी वारंवार करुनही संबंधीत विभागाकडून रेशन कार्ड मिळत नसल्याच्या समस्या बहुसंख्य दिव्यांग बांधवांकडून सातलिंग स्वामी यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी सातलिंग स्वामी यांनी उमरगा व लोहारा येथील तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका पुरवठा अधिकारी तथा नायब तहसीलदार यांना तात्काळ भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सदर समस्या येत्या 12 जुलैपर्यंत सोडवण्याविषयी विनंतीपूर्वक सूचना केली असता संबंधीत अधिकाऱ्यांनी वेळेत पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.
HTML img Tag
सदर बैठकिस उमरगा-लोहारा तालुक्यातील दिव्यांग बांधव व भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. बैठक सायंकाळी तब्बल 07:00 वाजेपर्यंत चालली. सदर बैठकीनंतर उपस्थित दिव्यांग बांधवांसाठी पाणी, चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.



