सास्तुर येथे भव्य खुल्या कुस्त्यी स्पर्धेत वैरागच्या पैलवानाने पटकावली चांदीची गदा

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे श्री शांतेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त भव्य खुल्या कुस्त्यां स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्त्या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 10 वाजता सास्तुर येथील सरपंच सौ.शितल ताई राहुल पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. सुरुवातीला बाल गटातील कुस्त्या पार पडल्यानंतर मोठ्या गटातील जंगी कुस्त्या संपन्न झाल्या. या कुस्ती स्पर्धेत अंतिम विजेता वैराग येथील पैलवान ने चांदीची गदा पटकावली. या विजेत्यास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा पाटील यांच्या हस्ते चांदिची गदा देण्यात आली. या प्रसंगी उपसरपंच मिथुन कुर्ले, राजवर्धन पाटील, माजी सरपंच विजयकुमार, क्षीरसागर, वीरेंद्र पवार, विराट पवार, सिद्धेश्वर माने, समीर पवार, तानाजी पवार, संपतराव पवार, प्रेमनाथ शिंदे, म्हाळपा, गंगाधर पवार, गोविंद यादव, राजवर्धन पाटील, शुभम देशमुख, सिद्धेश्वर माने, सातप्पा चिवरे, यांच्यासह ग्रामस्थ, श्री शांतेश्वर यात्रा समिती सास्तुर, परिसरातील पैलवान(मल्ल) उपस्थित होते.