लोहारा शहरासह तालुक्यात भाजपा स्थापना दिवस साजरा

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
भाजपा म्हणजे समर्थन, स्मृधदी आणि त्यागाचे नाव अनेक दशके राष्ट्रसेवेसाठी समर्थ भावनेने काम करणाऱ्या भाजपा पक्षाचा 44 वा स्थापना दिवस आ.राणाजगजितसिंह पाटील, भाजपा प्रदेश सरचिटणीस मा.आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा शहरात व तालुक्यातील अचलेर, जेवळी, आष्टा कासार, दस्तापुर, भोसगा, सास्तुर, कानेगाव, मोघा, मार्डी, आदि, गावात भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या घरी भाजप पक्षाचे ध्वज लावून भारतीय जनता पार्टी पक्षाचा स्थापना दिवस दि.6 एप्रिल 2023 रोजी साजरा केला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, अचलेर उपसरपंच प्रणाली राजेंद्र पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्षा आरती सतिश गिरी, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दगडु तिगाडे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे,पंचायत समिती माजी सदस्य वामन डावरे, बालासिंग बायस, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, युवराज जाधव, संपत देवकर, सुरेंद्र काळप्पा, हिराजी बुवा, महादेव कोरे, बसवराज कोंडे, काशिनाथ घोडके, आदी, गावचे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपा स्थापना दिवस साजरा केला.