लोहारा तालुका बुथ सशक्तीकरण आढावा बैठक संपन्न

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाची लोहारा तालुका बुथ सशक्तीकरण संदर्भात आढावा बैठक शहरातील जगदंबा मंदिर येथे दि.5 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आली.

यावेळी प्रमुख म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, अदि, उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी बूथ सशक्तीकरण संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. व स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा लोहारा शहरात दि.9 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली असुन या यात्रेत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे यावेळी सांगितले. व भाजपा स्थापना दिवस दि.6 एप्रिल रोजी कार्यकर्त्यांनी बुथवर व आपल्या घरी भाजप ध्वज फडकावुन साजरा करण्यात यावा. व तसेच सामाजिक न्याय पंधरवाडा, महात्मा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाजपा कार्यकर्त्यांनी साजरी करावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी यावेळी केले.

यावेळी खेड येथील भाऊराव राठोड यांनी
जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पक्षात जाहिर प्रवेश केला. यावेळी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भाजपाचे कार्यकर्ते आप्पाराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, भाजपा तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, भाजपा तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडु तिगाडे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, तालुका उपाध्यक्ष संजय कदम, पं.स. माजी सदस्य वामन डावरे, संपत देवकर, गोवर्धन मुसांडे, युवराज जाधव, रमेश भुरे, सागर गिरी, सुरेंद्र काळप्पा, भाऊराव राठोड, दत्तात्रय कडबाने, शुभम गोसावी, महादेव कोरे, समिर जमादार, गोविंद यादव, महेश पोतदार, अनिल अतनुरे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, कल्याण ढगे, नागनाथ मत्ते, गंगाधर पवार, उत्तम क्षीरसागर, संदिपान शिंदे, योगेश गिरी, सुधाकर जाधव, अमिर जमादार, यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!