कास्ती बु विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड बिनविरोध

लोहारा : लोहारा तालुक्यातील कास्ती बु विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन ,व्हाईस चेअरमन निवडीसाठी सोमवारी ३ एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सोसायटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सोसायटीच्या चेअरमनपदासाठी ज्ञानेश्वर कुंभार तर व्हाईस चेअरमनपदासाठी बालाजी गोरख परसे यांचा एकमेव अर्ज आल्याने यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी लोमटे यांनी केली.
यावेळी सोसायटीचे सचिव महारुद्र वकील, परवेज तांबोळी, शिवाजी भरगंडे, शिवराज काळे, बालाजी भरगंडे, ज्ञानेश्वर कुंभार, बालाजी परसे, विष्णू समदाळे, जयश्री चव्हाण, साधना कदम किसन चव्हाण, दत्ता भंडारे,गोविंद चव्हाण, विठ्ठल रवळे,सुधिर पाटील,मुकुंद परसे,शरद साबळे आदी उपस्थित होते.