शैक्षणिक
धाराशिव विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने विज्ञान विषय शिक्षकांचा गौरव

लोहारा / उमरगा : लोहारा तालुक्यातील हराळी येथील ज्ञानप्रबोधिनी शैक्षणिक संकुलात धाराशिव विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने विज्ञान विषय शिक्षकांना आज शनिवारी सन्मानित करण्यात आले.
यावेळी उमरगा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले,माजी जि.प. सदस्य शरण पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन पनुरे,शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक दिपक जवळगे, मंडळाचे जिल्हाध्यक्ष मा रविंद्र स्वामी सर, जिल्हा उपाध्यक्ष श्री आर.आर.गायकवाड सर, संकुलाचे केंद्र संचालक अभिजित कापरे, लोहारा तालुकाप्रमुख जगन पाटील, बळीराम सुरवसे, विलास भगत, मंडळाचे कार्याध्यक्ष किशोर पवार, विस्तार अधिकारी संतोष माळी, तालुकाध्यक्ष विनायक बगले उपस्थित होते.





