शिवशंभो महादेवाच्या यात्रेनिमित्त भातागळी येथे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन

लोहारा ( जि. धाराशिव ) : शिवशंभो महादेवाच्या यात्रेनिमित्त भातागळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथे भातागळी फेस्टिवल अंतर्गत राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे सात व आठ एप्रिल ला आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती फेस्टिवल समितीच्या वतीने देण्यात आली.
भातागळी येथे शंभू महादेवाची सात व आठ एप्रिलला भव्य अशी यात्रा असून ही यात्रा वाढावी यासाठी भातागळी ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रौढ गट समूह, मोठा गट वैयक्तिक , बालगट समूह ,बालगट वैयक्तिक ,लावणी खुला वैयक्तिक मुलीसाठी, युगल गट वैयक्तिक या पॅटर्न प्रमाणे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी एकूण 1लाख 51 हजार रुपयाची बक्षिसे ठेवण्यात आली असून विजेत्या स्पर्धकांना गटनिहाय प्रथम ,द्वितीय ,तृतीय पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच विजेत्या संघास ट्रॉफी व द्वितीय, तृतीय संघास मेडल्स देण्यात येणार आहेत.
कोरोनामुळे ही स्पर्धा बंद पडली होती सात वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ही स्पर्धा सुरू करण्यात आली असल्याने भातागळी ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे भातागळीची नृत्य स्पर्धा ही राज्यातल्या स्पर्धकासाठी आकर्षणाचा नेहमीच केंद्रबिंदू राहिला आहे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही स्पर्धा पार पडते यासाठी भातागळीच्या स्पर्धेचा नावलौकिक आहे.
स्पर्धकांची राहण्याची व जेवणाची समितीच्या माध्यमातून मोफत सोय करण्यात आलेली आहे.
सात एप्रिल रोजी बाल गट समूह, बालगट वैयक्तिक , लावणी खुला वैयक्तिक मुलीसाठी वय वर्ष १४ पर्यंत तसेच युगल गट वैयक्तिक वय वर्ष 14 पर्यंत याची स्पर्धा होईल.
आठ एप्रिल रोजी प्रौढ गट समूह मोठा गट वैयक्तिक , लावणी खुला वैयक्तिक 14 वर्षापासून पुढे मुलीसाठी ,युगल गट वैयक्तिक 14 वर्षापासून पुढे या प्रकारच्या स्पर्धा होतील.
जास्तीत जास्त स्पर्धकांनी व संघानी यात भाग घेऊन सहकार्य करावे अशी विनंती फेस्टिवल समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
सात व आठ एप्रिल रोजी या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी राज्यातील विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे.