भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात साजरी

लोहारा : लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.शेषेराव जावळे पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले.त्यानंतर प्रा. सुधाकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश माळी, निळकंठ कांबळे,इकबाल मुल्ला प्रकाश भगत, श्याम नारायणकर हे उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ.व्ही.यु. पाटील,डॉ.एस एस कदम, डॉ. आर.एम. सूर्यवंशी, प्रा. डी.एन .कोटरंगे, प्रा. व्हि. डी.आचार्य, प्रा.डॉ. पी.के. गायकवाड , प्रा.डॉ. आर. एस.धप्पाधुळे, प्रा.डॉ. सी. कडेकर ,प्रा. डॉ. पी.व्ही. माने, प्रा.डॉ. बी. एस. राजोळे ,प्रा. बी. बी.मोटे , प्रा.डॉ.एस. एन.बिराजदार, कार्यालयीन अधिक्षक मनोज पाटील,बालाजी सगर,शिरीष देशमुख , नंदकुमार माने,प्रवीण पाटील, प्रकाश राठोड परमेश्वर कदम आदी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. मनोज सोमवंशी यांनी मानले.