विलासपूर पांढरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन, व्हा. चेअरमनची निवड

जेवळी, ( ता.लोहारा ) : विलासपूर पांढरी (ता.लोहारा) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सौ. सुनिता बालाजी बिराजदार तर उपाध्यक्षपदी गजेंद्र शिवराम बिराजदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तालुक्यात विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अलिकडे पहिल्यांदाच एका महिलेची निवड झाली आहे.
विलासपूर पांढरी (ता. लोहारा) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणूक ही
आतापर्यंत एक- दोनदा अपवाद वगळता नेहमीच बिनविरोध होत आली आहेत. यावेळेस ही विकासाबरोबरच निवडणुकीतून वाद टाळण्यासाठी येथील नागरिकांनी एकत्र येऊन सर्व संचालकांची बिनविरोध निवड केली होती. आता सोमवारी (ता.६) निवडणूक निर्णय अधिकारी व्हि. एन. विभूते यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी नूतन संचालकाची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी या संस्थेच्या अध्यक्षपद सुनिता बिराजदार यांची तर उपाध्यक्षपदी गजेंद्र बिराजदार यांची बिनविरोध निवड निवड करण्यात आली आहे. यावेळी नुतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सरपंच मारुती कार्ले, उपसरपंच आशोक जांबळे, सुर्यकांत पाटील, माजी सरपंच काशिनाथ भुजबळ, महादेव कार्ले, किसन खोत, बसवेश्वर स्वामी, ग्रामसेवक देविदास कुर्ले, संस्थेचे सचिव जयप्रकाश जोगी, संचालक शिवाजी कार्ले, महादेव काशिगावे, महादेव कार्ले, महादेव जायफळे, विठ्ठल जांभळे, शिवाबाई बिराजदार, दयावती लोढे, देवाप्पा भुजबळ, सिध्देश्वर कार्ले, तानाजी बिरादाजर, निळकंठ काशिगावे, संतोष पाटील, शिवा कार्ले, सुभाष पाटील, गुरुदास पाटील, विजय बिराजदार, गहिनीनाथ बिराजदार, दगडू भिसे, बसवेश्वर कार्ले, मारुती पाटील, लक्ष्मण भुजबळ, ब्रहानंद कार्ले, राहुल खोत, सुदर्शन सरकाळे, तुकाराम तावशे, अशोक जिवना जांभळे, गुलाब भिसे, मच्छिंद्र सिरसाट आदी उपस्थित होते.