लोहारा नगरपंचायतच्या वतीने डॉ. सौ. रूपाली श्रीगिरे यांचा सत्कार

लोहारा : जागतिक महिला दिनानिमित्ताने नगरपंचायत लोहारा यांच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. नगर पंचायत लोहारा येथे आयोजित कार्यक्रमात मा.सौ. वैशालीताई अभिमान खराडे , नगराध्यक्षा लोहारा यांच्या शुभहस्ते डॉ. सौ. रुपाली श्रीगिरे यांचा आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. कु. अँड. आकांक्षा ज्ञानराज चौगुले या उपस्थित होत्या.

यावेळी मा.सौ. शमाबीताई आयुब शेख, श्रीमती कमलताई रामभरारे, मा. सौ. सारिकाताई प्रमोद बंगले, सौ. आरती ओम कोरे,मा.शामलताई बळीराम फुलसुंदर, मा. सौ. संगीताताई किशोर पाटील, मा. सौ. मयुरी ताई अमोल बिराजदार, मा. सौ. आरतीताई सतीश गिरी, मा.सौ. सुनीताताई विजयकुमार ढगे, मा. सौ. मुमताजताई अमीन सुंबेकर ,मा सौ. रुबीनाताई आरिफ खानापुरे, मा. सौ. सुमनताई दीपक रोडगे, मा. सौ. मीराताई अविनाश माळी, मा. सौ. ज्योतीताई दीपक मुळे, मा सौ. तुलसीताई प्रशांत काळे, मा. सौ. लताताई जालिंदर कोकणे, मा. सौ. नाजमीनताई आयुब शेख ,न्यू विजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या सौ. जाधव मॅडम,मा.सौ. ललिता ताई रोडगे इतर मान्यवर उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!