एस व्ही एस एस लातूर कॉलेज फिजिओथेरपी चा निकाल १०० टक्के

औसा – प्रतिनिधी
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा 2022 चा निकाल जाहीर झाला असून श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित एस व्ही एस एस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून सर्वच विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
तसेच द्वितीय वर्गातून प्रथम क्रमांक वैष्णवी मुंगळीकर ६६.५७%, दुसरा क्रमांक मानसी हंकारे ६६% तर तृतीय वर्गातून प्रथम क्रमांक साक्षी बोरकुटे ६८.२%,दुसरा क्रमांक आचल गारजरे ६३.४% व अंतिम वर्गातून प्रथम क्रमांक ऐश्वर्या राठोड ६३.६२% , दुसरा क्रमांक नेहा ब्राह्मणे ६१.५% तसेच याही वर्षी महाविद्यालयाची गुणवंत विद्यार्थ्यांची परंपरा मुलीने बाजी मारली आहे. तर या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, सचिव वेताळेश्वर बावगे, संचालक नंदकिशोर बावगे,प्राचार्य डॉ.विरेंद्र मेश्राम,डॉ.पल्लवी तायडे,डॉ. श्रद्धा नागमोडे,डॉ. दिपाली जाधव,डॉ.पवन कुमार डॉ.आरनिका राजपुरिया,डॉ.प्रतीक मेश्राम,डॉ.प्रेमसागर धाने,डॉ.धनश्री शिंदे,डॉ.शारदा धाडे, तसेच लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर, कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव, राजीव गांधी इन्स्टिट्यूट हासेगाव ,लातूर कॉलेज ऑफ आयटीआय,लातूर कॉलेज ऑफ सायन्स , ज्ञानसागर विद्यालय,गुरुनाथ आप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल या सर्व युनिटच्या प्राचार्यांनी अभिनंदन केले.