शरद पवार साहेबांनी खूप मोठे कार्य केले – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख

लोहारा ( जि.धाराशिव ) : शरद पवार साहेबांनी खूप मोठे कार्य केले आहे. त्यांनी केलेले कार्य, त्यांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून पक्ष बळकट करा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यभर शरद युवा संवाद यात्रा काढण्यात आली आहे. ही संवाद यात्रा गुरुवारी (दि.२) लोहारा तालुक्यात आल्यानंतर लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले. त्यानंतर शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख बोलत होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, निरीक्षक प्रशांत बाबर, प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे, अरुण आजबे, प्रशांत कवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापसिंह पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, नागन्ना वकील, बाबासाहेब जाधव, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष नाना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना शेख म्हणाले की, पक्षाचे कार्य, विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून पक्ष बळकट करा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी केले. या कार्यक्रमासाठी आदित्य गोरे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कोकणे, लोहारा नगरपंचायत उपनगराध्यक्ष आयुब शेख, गोविंद साळुंके, हाजी बाबा शेख, अमोल ओवंडकर, दादा पाटील, हेमंत माळवदकर, प्रकाश भगत, अप्पा देवकर, सलमान सवार, प्रविण पाटील, संजय जाधव, भास्कर कोळी, निहाल मुजावर, स्वप्नील माटे, दयानंद स्वामी, दत्ता कोकणे, विशाल शेवाळे, प्रशांत गिराम, प्रशांत हाके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब जानकर यांनी तर सचिन रणखांब यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!