सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंम्मेलनात सहभाग नोंदवा – अभिनेत्री कोमल कुंभार

“विश्वेश्वर फेस्टिव्हल 2023” विश्वेश्ववरय्या पॉलिटेक्निकच्या वार्षीक स्नेहसंम्मेलन 

औसा / रमेश शिंदे

औसा तालुक्यातील आलमला येथील विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, आलमला आयोजित विश्वेश्वर फेस्टिव्हल 2023 चे औचित्य साधून विश्वेश्वरय्या अभियांत्रीकी पदविका महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंम्मेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील व स्टार प्रवाह या वाहिनीवरील सहकुटुंब सहपरिवार फेम कोमल कुंभार (अंजी), यांच्या शुभहस्ते व संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, औसाचे माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे, सुनिल मिटकरी, शिरीष उटगे, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसचे सरचिटणीस महालिंग बाकशेट्टे, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हनमंत राचट्टे, औसा तालुका युवक कॉग्रेसचे अध्यक्ष प्रणिल उटगे, सचिव बसवराज धाराशिवे, युवक कॉग्रेस उमरगा चे योगेश राठोड, संचालक जयशंकर हुरदळे, विश्वनाथ निलंगेकर, विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे, शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाच्या प्रगतीचा लेखाजोखा सांगुन मराठवाडयातील पहिले एनबीए मानांकन मिळालेले महाविद्यालय असून विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी व त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी वार्षिक स्नेहसंम्मेलन म्हणजेच विश्वेश्वर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगीतले.
प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांनी बोलताना विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी संस्था गुणात्मकच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिकृ क्रिडा क्षेत्रातही आपले नाव कमवावे अशा संस्थेने राबविलेल्या उपक्रमाबद्दल संस्थाचालकांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अभिनेत्री कोमल कुंभार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांनो अभ्यास तर कराच पण तुमच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा वार्षिक स्नेहसंम्मेलनासारख्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवा. अशा उपक्रमामधुनच स्वत:च्या व्यक्तीमत्वाची जडणघडण होते. या वार्षिक स्नेहसंम्मेलनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध क्रिडास्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच हिवाळी परिक्षा 2022 मधील महाविद्यालयातून प्रथम, व्दितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांने विविध हिंदी, मराठी गाण्यावर नृत्य सादर करून तसेच पथनाटयाव्दारे प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमास आलमला परिसरातील पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. अंकुश बिडवे यांनी केले तर आभार प्रदर्शन विश्वेश्वरय्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य गोपाळ दंडिमे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागप्रमुख प्रा. रेवणसिध्द बुक्का, प्रा. प्रविण साबदे, प्रा. मंगेश बिडवे, प्रा. संदेश माडे, प्रा. अजित लोकरे, प्रा. अब्दुल समद काझी सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!