राज्यस्तरीय फार्मा व्हॉलीकपमध्ये डीजेपीएस कॉलेज ऑफ फार्मसी, पाथरी विजेता

स्पर्धेच्या द्वितीय स्थानी स्वामी विवेकानंद फार्मसी, उदगीर व तृतीय स्थानी शिवलिंगेश्वर फार्मसी, आलमला
औसा (प्रतिनिधी)-: “8 व्या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन फार्मा व्हॉली कप 2023” या स्पर्धेची अंतिम लढत स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसी, उदगीर व डीजेपीएस कॉलेज ऑफ फार्मसी, पाथरी यांच्यात होऊन चुरशीच्या व अटीतटीच्या सामन्यात डीजेपीएस कॉलेज ऑफ फार्मसी, पाथरीने निर्णायक सामना आपल्याकडे खेचताच ढोल ताशा, संगीत, फटाक्याच्या आतिषबाजीने व विद्याथ्र्यांच्या जल्लोषाने संपूर्ण मैदान विजयानंदाने दनानून निघाले.
राज्यस्तरीय स्पर्धेचे बक्षीस वितरण दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनूजी डगवाले, संस्थेचे सचिव बसवेश्वर धाराशिवे, प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे, विश्वेश्वरय्या पॉलिटेक्नीकचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे, प्रा. दिनेश गुजराथी, डॉ. समीर शफी, शिरीश उटगे, प्रणिल उटगे, मन्मथप्पा राचाट्टे यांच्या शुभहस्ते दिशा प्रतिष्ठान,लातूर, सांयटिफीक सेल्स प्रा.लि. लातूर, सिध्देश्वर सर्विसेस औसा, शैलेश ईलेक्ट्रीकल,लातूर, महालक्ष्मी प्लायलॅम,लातूर, मुसा पटेल ट्रेडींग कंपनी, औसा, आपली कॅन्टीन, आलमला, बाहेती टायईल्स, लातूर, आईप्लायलॅम, लातूर, श्रेयश कर्लस डेव्हलपर्स, आलमला, रामनाथ सुयोग सेवा, आलमला, रामनाथ कृषी सेवा, आलमला, विमल एजन्सीज, लातूर, हरुन स्टील ट्रेडर्स, लातूर, विश्वेश्वरया झेरॉक्स, आलमला, सायली टुर्स अॅन्ड ट्रव्हल्स, लातूर, नक्षत्र ग्लास अॅन्ड अॅल्युमिनीयम,लातूर, बोरा युनिफॉर्मस, लातूर, प्राची डिजीटल,लातूर, श्रीहरी मशनिरी, औसा, रामनाथ फर्निचर, आलमला, सिध्दी सोलार सेल्स अॅन्ड सÐव्हसेस, लातूर, के.के. ग्राफिक्स लातूर यांच्या वतीने अनुक्रमे तृतीय पारीतोषिक विजेते शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, आलमला, द्वितीय पारीतोषिक विजेता स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसी, उदगीर आणि प्रथम पारीतोषिक विजेता डीजेपीएस कॉलेज ऑफ फार्मसी, पाथरी यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम प्रदान करण्यात आले. यावेळी शिवराज बुलबुले, शिवाजी फावडे, बंटी मलाडे, अमर हजारे व माधव दुधभाते इत्यादी उपस्थित होते.
दिशा प्रतिष्ठान, लातूरचे अध्यक्ष सोनूजी डगवाले यंानी विजयी संघासह सहभागी सर्व संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या संस्थेने उत्तमरीत्या नियोजन करुन राष्ट्रीय पातळीसारखे अतिशय दर्जेदार व शिस्तबध्द पध्दतीने स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल संस्थाचालकाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. तसेच विद्याथ्र्यांचा विकास शिक्षणा बरेाबरच त्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण यावरही अवलंबून असल्याचे सांगितले. संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे यांनी संपुर्ण महाराष्ट्रातून तब्बल 42 संघानी “8 व्या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन फार्मा व्हॉली कप 2023” स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला त्याकरीता त्यांचे आभार मानले व विजयी संघाला शुभेच्छा देऊन भरभरुन कौतुक केले.
बेस्ट शिस्तबध्द संघ म्हणुन संजीवनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोपरगाव, नाशिक, बेस्ट लिफटर म्हणुन मंगेश डोंगरे, शिवलिंगेवर कॉलेज ऑफ फार्मसी, आलमला आणि बेस्ट स्मॅशर म्हणुन उदय गवळी, डीजेपीएस कॉलेज ऑफ फार्मसी, पाथरी, प्लेयर ऑफ द टोरनामेंट म्हण्ुन स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसी, उदगीरचा बुध्दभुषन सोनकांबळे यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेस पंच म्हणुन उपस्थित असलेले दिपक पाटील, सुनिल मुनाळे, मुजमिल शेख, स्कोरर विजय हांडे, बबलू मुंगळे, कादरी समदोद्दीन, डीजीटल स्काअर बोर्ड ऑपरेटर अनिकेत गायकवाड यांचा सत्कार शाल, श्रीफळ व ट्रॉफी देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुरज मालपाणी व डॉ. सचिन हंगरगेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरीता स्पर्धेचे प्रशासकीय अधिकारी योगेश्वर धाराशिवे, समन्वयक प्रा. प्रशांत धुमाळ, सय्यद सादत, युवराज काटु, डॉ. मोहम्मद रईस, डॉ. अजय फुगटे, गणेश गोसावी, संघाचे प्रशिक्षक विकास मुगळे व किरण रोडगे, कापसे विद्या, मयुरी चंद्रवंशी, सिरगिरे कविता, अनुजा सुर्ववंशी, सोमवंशी भागवत, सय्यद आझिम, वरद येवलेकर, गोपाळ माळी, गिरीश भावले, दयानंद कोरके, ज्ञानेश्वर बोंडगे, शिवकुमार आंबुलगे, राहुल वाडकर, संतोष लोणारे, नारायण राजपुत, अजय राठोड, जेवुरकर व्ही.पी., स्वामी व्ही.एम., शेख ईरफान, उटगे रुपाली, अरब हसन, पांढरे प्रितम, नागेंद्र मेंडोळे, पाटील यश, विठ्ठल गोसावी, वल्लेकर प्राकश हालकंचे शशिकांत, शिंदे बाबाराव, गुरव शंकर, होनरव महेश, अमोल कुंभार, कांबळे जयप्रकाश, घोडके ज्ञानेश्वर, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परीश्रम घेतले.