साने गुरूजी माध्यमिक विद्यालयात स्वयंशासन दिन व निरोप समारंभ संपन्न

औसा – प्रतिनिधी
अवंती नगर, लातूर येथील सानेगुरूजी माध्यमिक विद्यालयात 22 फेब्रुवारी 2023 रोजी इयत्ता 10 वर्गाचा स्वयंशासनदिन व इयत्ता 9 वी कडून 10 वर्गाला निरोप समारंभ आयोजित करण्याचा आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.व्हि. के.माने, प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव श्री कालिदास माने, प्रशासकीय अधिकारी श्री.जी.टी.माने, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आय.एच. शेख, स्वयंशासनदिनाचे मुख्याध्यापक विश्वजित शिंदे, उपमुख्याध्यापक सोमेश्वर शेंडगे उपस्थित होते.
इ. 10 वी च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेतच चांगले गुण मिळवणे हे छोटे ध्येय न ठेवता यू.पी.एस सी., एम.पी.एस.सी.,एन.डी.ए
बँकिंग, रेल्वे, इ.सारख्या स्पर्धा परिक्षेत झोकून देऊन यश मिळवून देशाची सेवा करण्याची संधी सोडू नका असे आव्हान व मार्गदर्शन
प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असलेले संस्था सचिव श्री कालिदास माने सर यांनी विद्यार्थ्यांना केले.
या प्रसंगी प्रमूख पाहुणे म्हणुन उपस्थीत असलेले प्रशासकीय अधिकारी श्री.जी.टी.माने यांनी पण इयत्ता 10वी विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.व्हि. के.माने यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणीला उजाळा देताना औपचारिक शिक्षणाबरोबर नैतिक शिक्षण घेवून देशाचा एक आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा असे समारोपीय भाषणात बोलत होते.
कार्यक्रमासाठी वर्गशिशिक्षिका स्मिता कावळे, वर्गशिक्षक श्री गणेश परळे, वर्गशिक्षक श्री वैभव धोत्रे, वर्गशिक्षक श्री राहुल गायकवाड तथा श्री हरिदास कोयले,श्रीमती शिवगंगा जगताप, श्रीमती कमल काळगापुरे,श्रीमती मिनाक्षी यादव,श्री शशिकांत पवार, कु.कोमल डोनगावे, श्री सतिश गायकवाड, श्री अमोल पवार, श्रीमती सुनंदा पाटील, श्री नवनाथ वडवळे, श्री.दयानंद लहाडे, श्रीमती पोर्णीमा बनसोडे, श्री भरत सुर्यवंशी, श्री सचिन माने, टेक्निकल विभागाचे सत्यपाल जाधव तर शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. सुर्यकांत सुतार, श्री दत्तात्रय सुडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक श्री. आय.एच.शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती मिनाक्षी यादव व श्री गणेश परळे यांनी केले तर आभार श्री गंगाधर डिगोळे यांनी मानले.