१० महिला बचत गटांना २१ लाखाचे कर्ज वाटप

लोहारा : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत जनसेवा महिला प्रभाग संघ सास्तुर आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सास्तुर यांच्या संयुक्त विद्यमाने बँक कर्ज मेळाव्याचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रभागातील १० महिला बचत गटांना २१ लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी बँक शाखा व्यवस्थापक राजीव गांजरे, तालुका अभियान व्यवस्थापक अलंकार बनसोडे, तालुका व्यवस्थापक प्रणिता कटकदौंड, तालुका समन्वयक राहूल मोहरे, प्रभाग समन्वयक प्रितम बनसोडे, प्रभाग समन्वयक प्रदिप चव्हाण, प्रभाग संघ व्यवस्थापक योगिता थोरात, बँक सखी मालन कांबळे समूदाय संसाधन व्यक्ती रेश्मा कादरी, पंचाशिला मनोहर, लक्ष्मी गायकवाड, सिटीसी सुनीता पवार यांच्यासह गटातील महिला उपस्थित होत्या.