लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा संप

लोहारा : महाराष्ट्र राज्य महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघ ,संयुक्त कृती समिती तसेच औरंगाबाद विभागात अशासकीय महाविद्यालयीन शिक्षेत तर कर्मचारी संघटनेचे लोहारा शहरातील शिक्षणाचे केंद्र असलेले शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय येथे एक दिवशीय संप पुकारला असून यात शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, संयुक्त कृती समिती तसेच औरंगाबाद शासकीय महाविद्यालय कर्मचारी संघटना औरंगाबाद यांनी महाराष्ट्र शासनाकडे शिक्षकेतर कर्मचारी यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करणे ,सातवा वेतन आयोगानुसार 10,20,30 लागू करणे, 58 महिन्याची थकबाकी अदा करणे ,जुनी पेन्शन योजना लागू करणे, 1410 पदाला सातवा वेतन आयोग लागू करणे, या मागण्यासाठी बुधवारी 15 फेब्रुवारी रोजी बैठक झाली. परंतु लेखी न मिळाल्यामुळे आज गुरुवारी 16 फेब्रुवारी रोजी लोहारा शहरातील शिक्षणाचे केंद्र असलेले शंकराव जावळे पाटील महाविद्यालयाच्या समोर एक दिवशीय लक्षणीक संप पुकारण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning

या संपात अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे उस्मानाबाद जिल्हा सरचिटणीस डॉ. शिरीष देशमुख, शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष श्री प्रवीण पाटील, श्री बालाजी सगर, श्री नंदकिशोर माने,श्री परमेश्वर कदम, श्री प्रकाश राठोड आदी सहभागी झाले होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!