जेवळी येथे मध्यान भोजनाच्या योजने संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात कामगार प्रतिनिधीची बैठक

लोहारा : सदर मीटिंगला शिवसेना धाराशिव जिल्हा प्रमुख मोहन पणुरे व तंटामुक्ती अध्यक्ष भैरप्पा श्रीशैल यांच्या आदेशाने उत्तर जेवळी ग्रामपंचायत कार्यालय सभागृह येथे बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी जेवळी ग्रामपंचायत व छत्रपती कामगार संघटना यांच्या वतीने कामगारांचे विविध प्रश्न सोडवण्यासंदर्भात दिनांक 11 7 2023 रोजी बारा ते अडीच या वेळेत उपसरपंच जेवळी तथा कृषी उत्पन्न बाजार समिती मुरूमचे उपसभापती बसवराज कारभारी यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेण्यात आली
यावेळी आर्, एन ,वाघमारे .ग्रामविकास अधिकारी यांनी 90 दिवसाच्या प्रमाणपत्र संदर्भातील शासन परिपत्रक व वरिष्ठांच्या आदेशाचे वाचन करून कामगारांना व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना आणि कामगार प्रतिनिधीं यांना वाचून दाखवले .
यामध्ये ग्रामसेवकांनी बांधकाम कामगार व त्यांच्याशी निगडित कामगारांना प्रमाणपत्र द्यावे,असा आदेश आहे.पण यामध्ये सर्व ग्रामसेवकांच्या म्हणण्यानुसार कामगाराकडून कोणते कागदपत्रे घेऊन प्रमाणपत्र द्यावे .असा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे ग्रामसेवक संघटना संभ्रमित झालेली आहे यानंतर संघटनेचे सचिव तिम्मा दुर्गाप्पा माने .यांनी शासकीय योजनेचे कामगारांसमोर वाचन करून मध्यान भोजना संदर्भात नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे .
यानंतर सरकारी कामगार अधिकारी कोणाळे साहेब यांनी .फोनवरून सदर मिटींगला व कामगार प्रतिनिधींना मध्यान भोजना संदर्भात माहिती देऊन नोंदणी शिवाय जेवण भेटणार नाही अशी माहिती दिली आहे .
तसेच छत्रपती कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा सदर मिटींगचे प्रमुख मार्गदर्शक तानाजी गायकवाड उर्फ गवळी यांनी शासनाच्या व प्रशासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे मराठवाड्यातील सर्व कामगारांचे मध्यान व रात्रीचे जेवण दिनांक एक जुलै 2023 पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद करण्यात आलेले आहे .
शासनाची पुढील अट बांधकाम कामगारांनी ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र घेऊन ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय जेवण भेटणार नाही .अशी अट घातल्यामुळे व दुष्काळ परिस्थितीमुळे कामगारावर उपासमारीची वेळ आलेली आहे.असे म्हणून छत्रपती कामगार संघटनेच्या व बसवराज कारभारी उपसरपंच ग्रामपंचायत च्या वतीने तसेच कामगारांच्या वतीने शासनाच्या जाचक अटी रद्द करून बांधकाम कामगारांची नोंदणी करून घ्यावे व त्यांना शासकीय विविध योजनेचा लाभ द्यावे .अशी मागणी करण्यात आली आहे .
उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील वर्ष 2020 पर्यंत अंदाजे 60 हजार कामगारांची नोंदणी झालेली होती.
यानंतर व आत्तापर्यंत जिल्ह्यातील फक्त चार ते पाच हजार कामगारांचीच नोंदणी शासकीय रेकॉर्डला दिसत आहे.कामगारांची नोंदणी का वाढत नाही .यावर वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार साहेबांनी लक्ष घालून कामगारांची नोंदणी वाढविण्या संदर्भात आदेश द्यावे.अशी छत्रपती कामगार संघटनेच्या वतीने शासनाला विनंती करण्यात येते.सदर मिटिंग मध्ये कामगाराने एसटी वरील जाहिराती पाहून कामगारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे .अशा व्यथा कामगारांनी मांडल्या आहेत.असे तानाजी गायकवाड साहेब यांनी मत व्यक्त केले आहे .
सदर मीटिंग चांगल्या प्रकारे यशस्वी होऊन सदर मीटिंग मधील सहकारी, कामगार प्रतिनिधी तसेच इतर प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी यांचे मीटिंगमध्ये भाग घेऊन मार्गदर्शन केल्याबद्दल, संघटनेचे उपाध्यक्ष बालाजी माठे .यांनी आभार व्यक्त करून सदर मीटिंग संपली असे जाहीर करण्यात आले. सदर मिटींगला परिसरातील कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.