पुलासाठी निधी मंजूर केल्याने आ.चौगुले यांचा लोहारा खुर्द येथील शेतकऱ्यांकडून सत्कार

उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या कारभारी वस्ती ते नागुर रस्त्यावर गावाजवळील द्वारका नदीवर पुलाचे बांधकाम करणे या कामासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सतत पाठपुरावा करून नाबार्ड टप्पा – 28 अंतर्गत 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असुन याबाबत नुकताच मंजूरी आदेश निघाला आहे. याबद्दल लोहारा खुर्द येथील शेतकऱ्यांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांची भेट घेऊन सत्कार केला. याप्रसंगी सरपंच सचिन रसाळ, व्यंकट रसाळ, महादेव आरगडे, मदन लोखंडे, दत्ता सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी, अजय रसाळ, हणमंत सूर्यवंशी, सतिश रसाळ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!