११ नोव्हेबरला लोकमंगल कारखान्याचा काटा बंद करून बेमुदत उपोषण

लोहारा (उस्मानाबाद ) : तालुक्यातील लोहारा खुर्द,खेड शिवारातील लोकमंगल माऊली साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२१- २०२२ या वर्षीचा बिल हप्ता जाहीर केल्यानुसार उर्वरित ५०० रुपये प्रमाणे हप्ता न काढण्यास ११ नोव्हेबर रोजी लोकमंगल कारखान्याचा काटा बंद करून बेमुदत उपोषण करण्याचा लोहारा तालुक्यातील होळीसह परीसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, तहसिलदार,पोलीस ठाणे यांना दिलेल्या निवेदनात इशारा दिला आहे.