उमरगा – लोहारा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे घेतली शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांची भेट

मुंबई : शिवसेना भवन मुंबई येथे उमरगा व लोहारा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव अनिल देसाई यांची बुधवारी भेट घेतली. याप्रसंगी उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्ष संघटना व पक्षबांधणी संदर्भात चर्चा करण्यात आली.
उमरगा लोहारा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सदस्य नोंदणी अभियान प्रभाविपणे राबवावे असे यावेळी त्यांनी सांगितले.हे अभियान राबवत असताना येणाऱ्या नगरपालिका,पंचायत समीती व जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सर्व शिवसेना पदाधिकांऱ्यांनी जोमाणे सदस्य नोंदणी अभियान रावबावे असे सांगीतले.
यावेळी शिवसेना नेते विश्वनाथ नेरुळकर,उस्मानाबाद जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास पाटिल, जिल्हाप्रमुख गौतम लटके,विधानसभा संपर्कप्रमुख अनंत पाताडे,उपजिल्हाप्रमुख बस्वराज वरनाळे,उमरगा तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे,युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार,लोहारा शहरप्रमुख सलिम शेख,उमरगा शहरप्रमुख राजेंद्र सुर्यवंशी,तुळजापुर शहरप्रमुख सुधिर कदम यासह उस्मानाबाद जिल्हातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित उपस्थित होते.