मुल्ला कुटुंबातील उमेबतुल, माहेरा आणि मोहमद ने केला पहिला रोजा

लोहारा / प्रतिनिधी
लोहारा येथील हॉटेल व्यवसायिक रेहमान उर्फ दादा मुल्ला यांच्या ५ वर्षाच्या उमेबतुल रहेमान उर्फ दादा मुल्ला त्यांचे लहान बंधु खासीम मुल्ला यांची मुलगी माहेरा खासीम मुल्ला वय ५ आणि मुलगा मोहमद खासीम मुल्ला वय ७ वर्ष या लहानानी आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला आहे.
सध्या रमजान महिन्याचे रोजे अर्थात उपवास अति उन्हाळ्यात आले आहे. या उष्णतेच्या कडक्याने अनेकजण त्रस्त आहे.आशा उष्णतेच्या स्थित उमेबतुल,माहेरा,मोहमद ने इतक्या कमी वयात रोजा (उपवास)पूर्ण केल्याबद्दल तिचे मुल्ला कुटुंबीय सह अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.