लोक वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

लोहारा ( जि.उस्मानाबाद ) : लोहारा शहरातील लोक वाचनालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी राष्ट्रपती कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष वैशाली खराडे व उपनगराध्यक्ष आयुब शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भानुदास राव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य श्री घोलकर ,अँड. संध्या तिघाडे – भुसने , संस्थेचे अध्यक्ष आयुब शेख, सचिव माणिक तिगाडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या थोर कार्याला प्राचार्य घोलकर अँड संध्या तिगाडे ,प्रा. संतोष बायस यांनी उजाळा देऊन आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला तुकाराम विरोधे, संजय जेवळीकर ,विजय महानूर, एकनाथ झिंगाडे,सोमवंशी, शिवबा बोराळे यांच्यासह वाचक, पुस्तक प्रेमी यावेळेस बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत संगशेट्टी यांनी केले.
Very nice and happy brithday my sweetheart