दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

इकबाल मुल्ला
लोहारा / प्रतिनिधी
वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय लोहारा येथे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.दिनांक 30 जानेवारी 2023 व 31 जानेवारी 2023 या दोन दिवशीय वार्षिक स्नेहसंमेलनात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.दिनांक 30 जानेवारी रोजी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीमती यु.व्हि.पाटील होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून संदीप पाटील (नायब तहसीलदार लोहारा), रवी पवार(पीएसआय लोहारा),श्रीमती मैंदर्गी मॅडम (गटशिक्षणाधिकारी लोहारा),रमेशबापू जावळे-पाटील (अध्यक्ष),डॉ.शेषराव जावळे-पाटील (सचिव),पत्रकार निळकंठ कांबळे,बालाजी बिराजदार,गिरीश भगत, माजी नगरसेवक शाम नारायणकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन शिंदे यांनी केले.यानंतर तहसीलदार संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धेतील वसंतदादा पाटील हायस्कूल शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.त्यानंतर विविध कला गुणदर्शन या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यात प्रा.विद्याधर बुवा,ज्ञानेश्वर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुगम गीत गायन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.त्यानंतर डान्स स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी 30 गाण्यावर वैयक्तिक व ग्रुप डान्स केले.दुसऱ्या दिवशी दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीमती यु.व्हि.पाटील होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून अँड.शितल चव्हाण,पत्रकार कालिदास गोरे,अशोक दुबे, गणेश खबोले,निरंजन माळी (दामिनी पथक),भास्कर जाधव,प्रा.विजय उंबरे,प्रा.आर. सी.आष्टेकर,प्रा.एस.एस. बहिरे, प्रा.डि.व्हि.शिंदे, प्रा.डी.आर.साठे,अदि,मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.एस.बहिरे यांनी केले. यानंतर अँड.शितल चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यानंतर प्राचार्य यु.व्हि.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यानंतर नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित विविध क्रीडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना तसेच सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.क्रीडा विभाग प्रमुख प्रा.प्रशांत काळे व नागनाथ पांढरे यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचाही सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यानंतर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.सचिन शिंदे व धनराज धनवडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.सर्वप्रथम सुगम गीत गायन विद्यार्थ्यांनी सादर केले.

यानंतर प्रा.डी.आर.साठे दिग्दर्शित मुलगा मुलगी एक समान हि नाटिका इयत्ता 11 वी, व 12 वीच्या मुलींनी सादर केली.तसेच यावेळी लेझीम डान्स,ग्रुप डान्स, वैयक्तिक डान्स या मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.यानंतर शेला-पागोटे (फिश- पॉऊड) चे वाचन प्रा.एस. एस.बहिरे,प्रा.आर.सी.आष्टेकर,बालाजी ईरुदे,भास्कर जाधव यांनी केले.या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी व पालक यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन शाळा कॉलेजच्या वतीने करण्यात आले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य यु.व्हि. पाटील,शाळे व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी,शिक्षक,प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!