पिक विमा 2021 च्या याचिकेवर राज्यस्तरीय समितीची बैठक मुंबई येथे संपन्न

मुंबई : राष्ट्रवादी कॉग्रेसचे अनिल जगताप यांनी दाखल केलेल्या पिक विमा 2021 च्या याचिकेवर राज्यस्तरीय समितीची बैठक मंत्रालय मुंबई येथे प्रधान सचिव कृषी श्री एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनामध्ये पार पाडली.
सदरील बैठकीत 2021 च्या पिक विमा बाबत सविस्तर चर्चा झाली असून आठवडाभरात सकारात्मक निर्णय जाहीर करणार असल्याचे संकेत मिळत आहेत गेल्या वर्षी बजाज अलायन्स पिक विमा कंपनीने केंद्र शासनाच्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावून उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ पन्नास टक्के रक्कम वितरित केली होती जी ३८८ कोटी इतके होती तर काही पूर्व सूचनाची जवळपास 35 टक्के रक्कम येणे बाकी आहे चुकीचा अर्थ लावून दिलेल्या नुकसान वाटपाच्या प्रक्रिये बाबत मी राज्यस्तरीय समितीकडे आपली दाखल केले होते त्या अनुषंगाने आज सुनावणी पार पडली.
2021 च्या बाबत सध्या न्यायालयात सुनावणी सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आर आर सी कार्यवाहीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे स्थगिती उठवण्याबाबत मी, सचिव एकत्रित बसून तातडीने प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत सूचना एकनाथ डवले साहेब यांनी केली आहे तसेच दिलेल्या निर्णयाचा त्या न्यायालयीन प्रक्रियेवर काही परिणाम होणार नाही याचीही दक्षता घेऊन हा निर्णय देणारे असल्याचे त्यांनी सांगितले
या बैठकीत गेल्यावर्षीचे पैसे द्यायला विलंब झाल्याने कंपनीने 12% व्याजदराने रक्कम वितरित करावे हाही मुद्दा मांडला तसेच गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टाने ७२ तासाच्या पूर्वसूचनेचा मुद्दा कालबाह्य ठरविला असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील गेल्या वर्षी विमा भरलेल्या सर्वच अर्थात सहा लाख 66 हजार 436 शेतकऱ्यांना मुद्दा विमा द्यावा हा मुद्दा मांडला व तशी प्रोसिडिंगला ही नोंद घेण्यात सांगितले.
सदरच्या बैठकीला प्रधान सचिव श्री एकनाथ डवले vc द्वारे राणा जगदीश सिंह पाटील तर प्रत्यक्षात आमदार कैलास पाटील आमदार ज्ञानराज चौगुले उपस्थित होते कृषी विभागाच्या आवर सचिव नीता शिंदे सहसचिव सरिता बांदेकर देशमुख मी शेतकरी प्रतिनिधी सुधीर सुपनार ,मंत्रालयातील कृषी विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता तसेच पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी ही उपस्थित होते.