शिवलिंगेश्वर फार्मसी रासेयोच्या विशेष वार्षिक शिबिराचा समारोप

औसा / रमेश शिंदे 
औसा तालुक्यातील श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी मधील राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने घेण्यात आलेल्या विशेष वार्षिक शिबिराचा दि. 23 जानेवारी 2023 रोजी सत्तरधरवाडी येथे संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे यांच्या उपस्थितीत समारोप कार्यक्रम संपन्न झाला.
समारोप कार्यक्रमात नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. पुढे बसवराज धाराशिवे यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद शाळेतील गरीब, होतकरु विध्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने वही व पेन भेट देण्यात आली आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजीक व मानवीय मुल्यांची जोपासना करण्याची भावना निर्माण होते असे मत प्रकट केले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भगवान दोरवे, ग्रामसेवक अनिल रोडगे, महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्रा. डॉ. समीर शफी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन हंगरगेकर, ग्रामस्थ अच्युत गायकवाड, जेठालाल रोठोड, शिवराज पाटील, कल्पना कांबळे, खंडू गायकवाड, शिवाजी चहाण, दशरथ बोडके, प्रा. कविता सिरगिरे, वर्षाराणी जाधव इत्यादी उपस्थित होते.
आझादी का अमृत महोत्सवा निमित्त यूवकांचा ध्यास, ग्राम, शहर विकास, स्वास्थ, आरोग्याची जनजागृती, समाजाप्रती सेवाभाव, स्वच्छता अभियान, रस्ता सुरक्षा अभियान, डिजीटल साक्षरता सारख्या विविध उपक्रमांनी शिबिराची सांगता करण्यात आली.
या विशेष वार्षिक शिबीराच्या यशस्वतीतेसाठी विद्यार्थी , शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व वाहन चालक अर्जुण शिंदे यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी सत्तरधरवाडी येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन हंगरगेकर यांनी केले तर जिल्हा परीषद शाळेचे मुख्याध्यापक भगवान दोरवे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!