उमरगा ते पंढरपूर व लातुर ते तिरुपती सायकल प्रवास करणाऱ्याचा आ. चौगुले यांनी केला सत्कार

उस्मानाबाद :  उमरगा येथील अनिल मदनसुरे व संजय सरपे या दोघांनी नुकताच सायकलीवर उमरगा ते पंढरपूर व पंढरपूर ते घुमान असा 2500 कि.मी. प्रवास पुर्ण केला आहे, याबद्दल त्यांचा रविवारी ११ डिसेंबर रोजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी संपर्क कार्यालयात सत्कार केला. तसेच लातुर ते तिरुपती सायकल प्रवासास निघालेले लातूर येथील बालाजी केदार,मयुर साबणे, लक्ष्मीकांत दरगु यांचाही यावेळी सत्कार करून त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, अरुण जगताप, प्रताप कटके, व्यंकट पाटील, अमर देशटवार, खय्युम चाकुरे, हणमंत शिंदे, संदीप चौगुले, मनोज जाधव, बालाजी गायकवाड, ॲड.सत्यम चौगुले, श्रीराज मुसांडे आदी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!