पहिली कुस्ती खसगीचा मुंनतजीर सरनोबत यांनी जिंकले

जेवळी, (ता.लोहारा) : लोहारा तालुक्यातील धानुरी येथील देवबेट देवी येथे यात्रे निमित्त पार पडलेल्या कुस्तीच्या दंगलीत दीड किलो चांदीचा गदा व एकेविस हजार रुपयांसाठीची पहिली कुस्ती ही मुंनतजीर सरनोबत (खसगी) यांनी जिंकले यावेळी कुस्ती पाहाण्यासाठी परिसरातील कुस्ती प्रेमीची मोठी गर्दी झाली होती.
निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या धानुरी येथील देवबेट देवीची (ता लोहारा) ओळख तुळजापूर भवानीची उपपीठ म्हणून आहे. शासनाच्या विविध योजना तसेच या क्षेत्राला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने येथे भरीव विकास कामे झाले आहेत. येथे नवरात्र महोत्सवात घटस्थापनेपासून ते पौर्णिमेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. या ठिकाणी प्रतिवर्षी विजया दशमीला यात्रा भरते. या निमित्त बुधवारी विजयादशमी (दसरा) दिनी (ता ५) पहाटे दोन वाजता, होमहवन, बलीदान, नवरात्रोत्थापन व शोभेचे दारु काम पार पडले. सायंकाळी चार वाजता कुस्त्याचे दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कै त्र्यंबकराव साळुंके यांच्या स्मरणार्थ माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड दिपक जवळगे व ग्रामस्थ यांच्याकडून ठेवण्यात आलेल्या दीड किलो चांदीचा गदा व एकेविस हजार रुपये बक्षीसासाठीची पहिली कुस्ती ही मुंनतजीर सरनोबत (खसगी) विरुद्ध सुनील जाधव (परंडा) यांच्यात झाली. या चुरशीच्या लढतीत मुंनतजीर सरनोबत यांनी बाजी मारली. यावेळी विजयी मल्लांचे सत्कार केला याप्रसंगी जिल्हा परिषद माजी सदस्य ॲड दिपक जवळगे, सरपंच प्रवीण थोरात, उपसरपंच विठ्ठल बुरटूकणे, माजी उपसरपंच संभाजी वडजे, तंटामुक्त अध्यक्ष राम पाटील, उपाध्यक्ष श्रीकांत जाधव, करजगाव उपसरपंच नागनाथ पवार, महादेव जाधव, दयानंद साळुंके, लक्ष्मण सुरवसे, अब्बास शेख, नितीन सूर्यवंशी, सचिन तिगाडे, आरिफ देशमुख, महेश साळुंके, सतीश लोहटकर, सुरज साळुंके, राम मुसांडे, बालाजी सुरवसे, लक्ष्मण सूर्यवंशीसह परिसरातील कुस्ती प्रेमी नागरीकांचु मोठी गर्दी झाली होती. स्पर्धेचे समालोचन गोविंद घारगे यांनी केले.